Mayem Protest against Mining Transport
Mayem Protest against Mining TransportDainik Gomantak

मयेतील आंदोलन तापले, सरपंचांसह पत्रकार ताब्यात

भूमिकेशी ठाम राहिल्याने काही आंदोलनकर्त्यांवर पोलिसांची कारवाई
Published on

डिचोली : मयेतील खाण वाहतूक विरोधी आंदोलनाला बुधवारी दुपारी वेगळेच वळण मिळाले. आंदोलक आपल्या भूमिकेशी ठाम राहिल्याने अखेर स्थानिक सरपंचांसह छायाचित्रकार तसेच काही नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. धूळ प्रदूषण आणि बेदरकार खनिज वाहतुकीने त्रस्त बनलेल्या मयेतील स्थानिकांनी बुधवारी सकाळी खनिज वाहतूक अडवली होती.

Mayem Protest against Mining Transport
वाळपईतील डॉ. हेडगेवार विद्यालयासमोर गतिरोधकाची गरज

धूळ प्रदूषण टाळण्यासाठी अगोदर रस्ते पाण्याने भिजवा. पाण्याची समस्या दूर करा, अशी मागणी करीत पैरा येथील चौगुले खाणीवरून (Mining) खनिज घेऊन आलेले ट्रक गावकरवाडा येथे बुधवारी सकाळी स्थानिकांनी अडवले. आंदोलनस्थळी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी मयेत (Mayem) आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रयत्न केले. मात्र बराचवेळ चर्चा करूनही तोडगा निघत नसल्याने आणि नागरिक आपल्या भूमिकेशी ठाम राहिल्याने काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. सरपंच सीमा आरोंदेकर, त्यांचे पती संजय आरोंदेकर आदी नागरिकांसह दै.'गोमन्तक'चे छायाचित्रकार संदीप देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस स्थानकात नेले.

Mayem Protest against Mining Transport
पिसुर्लेत तीव्र पाणी टंचाई; कोटी रुपयांचा प्रकल्प नावालाच!

दरम्यान, कळसोत्सवानिमित्त दोन दिवस बंद असलेली खनिज वाहतूक मंगळवारी मध्यरात्रीच सुरु करण्यात आली. बेदरकार आणि अनियंत्रित वाहतुकीमुळे कळसोत्सवानिमित्त भाविकांनी उभारलेल्या तोरणांची मोडतोड झाल्याने नागरिक नाराज बनले आहेत. बेदरकार वाहतूक (Traffic) आणि धूळ प्रदूषण यामुळे त्रस्त बनलेल्या मयेतील जनतेने मंगळवारी 8 मार्च रोजीही सुमारे तासभर खनिज वाहतूक रोखली होती. यानंतर सरपंचांनी खनिज वाहतुकीस विरोध केला होता. त्यामुळे आधीच वादात असलेल्या खनिज वाहतुकीसमोर दरदिवशी एक संकट उभे ठाकत असल्याचं चित्र आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com