मयेत पुन्हा खनिज वाहतूक रोखली

नियम पाळण्याची स्थानिकांची मागणी, प्रदूषणासह रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
Mayem Mining
Mayem MiningDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : धूळ प्रदूषण आणि बेदरकार खनिज वाहतुकीने त्रस्त झालेल्या मयेतील नागरिकांनी बुधवारी सकाळी खनिज वाहतूक रोखून धरली. धूळ प्रदूषण टाळण्यासाठी अगोदर रस्ते पाण्याने भिजवा, अशी मागणी करत पैरा येथील चौगुले खाणीवरून खनिज घेऊन आलेले ट्रक गावकरवाडा येथे अडविले.

Mayem Mining
मयेतील शेतकरी आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

दरम्यान, कळसोत्सवानिमित्त दोन दिवस बंद असलेली खनिज वाहतूक मंगळवारी मध्यरात्रीच सुरु करण्यात आली. बेदरकार आणि अनियंत्रित वाहतुकीमुळे कळसोत्सवानिमित्त भाविकांनी उभारलेल्या तोरणांची मोडतोड झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याआधीही खोदकामामुळे मये (Mayem) गावातील अंतर्गत रस्ता वाहतुकीस धोकादायक बनल्याने रस्ता सुस्थितीत येईपर्यंत खनिज वाहतूक बंद ठेवावी, अशी मागणी मये-वायंगणी पंचायत सरपंच सीमा आरोंदेकर यांनी पत्रकार परिषदेत केली होती.

Mayem Mining
'रस्ता व्यवस्थित होईपर्यंत मयेत खनिज वाहतूक नको'

बेदरकार वाहतूक (Traffic) आणि धूळ प्रदूषण यामुळे त्रस्त बनलेल्या मयेतील जनतेने मंगळवारी 8 मार्च रोजीही सुमारे तासभर खनिज वाहतूक रोखली होती. यानंतर सरपंचांनी खनिज वाहतुकीस विरोध केला होता. त्यामुळे आधीच वादात असलेल्या खनिज वाहतुकीसमोर दरदिवशी एक संकट उभे ठाकत असल्याचं चित्र आहे. डिचोली (Bicholim) तालुक्यातील मये येथे रस्त्याच्या बाजूने नवीन जलवाहिनी टाकण्याचे कामही सध्या सुरु आहे. त्यातच जिओच्या केबल टाकण्याचेही काम सुरु आहे. सध्या रस्त्यावरुन खनिज वाहतुकीचा ताण वाढल्याने प्रदूषणासह रस्ते वाहतुकीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Cutbona jetty sanitation issues Goa
Mapusa Market Nullah Cleaning
Goa Assembly Elections 2027
Goa Human Trafficking
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com