Shobhana velip zp kotigao cancona Dainik Gomantak
गोवा

सभापती तवडकर कामासाठी दबाव आणतात, अपमानित केले; पैंगीण ZP सदस्य बैठकीत ढसाढसा रडल्‍या

मी कोणाला धमकी वा कोणावर दबाव आणला नाही : तवडकर

दैनिक गोमन्तक

South Goa Zilla Panchayat : सभापती तथा काणकोणचे आमदार रमेश तवडकर हे आपल्‍यावर विविध कामांसाठी दबाव आणतात. गरिबांची कामे करण्याऐवजी आपल्‍या संस्थेच्या शाळेचे काम करायला सांगतात.

खोतीगावात झालेल्‍या महिला शक्ती कार्यक्रमावेळी त्‍यांनी मला अपात्र ठरवण्याची धमकीही दिली, असे सांगून पैंगीण जिल्हा पंचायत सदस्य शोभना वेळीप जिल्हा पंचायतीच्या बैठकीतच ढसाढसा रडल्या. आपल्याला प्रत्येक वेळी त्‍यांनी अपमानित केले, असा आरोपही केला.

कणकोणच्‍या आमदारांकडून लोकप्रतिनिधीचा कोणत्याही प्रकारचा सन्मान केला जात नाही, उलट त्‍यांना अपमानित केले जाते.

लोकांच्या कामांसाठी आवश्यक परवानगीची पत्रे देण्यास ते टाळाटाळ करतात, असा आरोप शोभना वेळीप यांनी केला.

याबाबत दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर यांनी सांगितले की, अजूनही माझ्‍याकडे शोभना वेळीप यांनी तक्रार केलेली नाही.

काम करण्याबाबत त्यांनीच सहमती दर्शविली होती. त्यामुळे दबावाचा प्रश्नच येत नाही. जिल्हा पंचायत सदस्यांच्या कामात कुणीही ढवळाढवळ करत नाही. आमदार व जिल्हा पंचायत सदस्यांचे पटत नाही त्यावेळी अशा घटना घडतात.

"मी कोणाला धमकी दिली नाही वा कोणावर दबाव आणला नाही. भाजपच्‍या जिल्‍हा पंचायत सदस्‍य असूनही शोभना वेळीप या विरोधकांच्‍या व्‍यासपीठावर दिसायच्‍या. त्‍यामुळे ‘मनात आणले असते तर पक्षविरोधी कारवायांमुळे तुझे सदस्यत्‍व रद्द झाले असते’ असे मी म्‍हटले होते. त्‍यांना चिथावणारे वेगळेच आहेत."

- रमेश तवडकर, सभापती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

SCROLL FOR NEXT