International Poetry Day Dainik Gomantak
गोवा

Goa Poetry Convention: 'कविता ही जीवनाला अर्थ देणारी परिभाषा'

दशरथ परब: मनसा क्रिएशन्सतर्फे आंतरराष्ट्रीय कवितादिन

दैनिक गोमन्तक

पणजी: कविता थेट मनातून उतरते. ती जगण्याला अर्थ देते. कवितेने मला बळ दिले, सामर्थ्य दिले. कविता म्हणजे तुमच्या, माझ्या जीवनाला अर्थ देणारी परिभाषा आहे, अशा शब्दांत इन्स्टिटयूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष व कवी दशरथ परब यांनी कवितेविषयी आपले मत व्यक्त केले. मनसा क्रिएशन्सतर्फे आयोजित आंतरराष्टीय कविता दिवस कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर विशेष निमंत्रित म्हणून माहिती व प्रसिद्धी संचालनालयाचे सहाय्‍यक माहिती अधिकारी श्याम गावकर, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष राजमोहन शेट्ये, मिरामार यूथ हॉस्टेलचे संचालक अनंत जोशी, कवी गीतकार जॉन आगियार, मनसा क्रिएशन्सच्या अध्यक्ष कालिका बापट उपस्थित होत्या. राजनी रायकर यांनी सूत्रनिवेदन केले.

मनसा क्रिएशन्सतर्फे 21 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय कविता दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने मिरामार पणजी येथील यूथ हॉस्टेलमध्ये आयोजित ‘काव्योत्सव’चे उद्‍घाटन कवी परब यांनी केले. त्यानंतर कवी गौरीश वेर्णेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘काव्यरंग’ मध्ये दशरथ परब, श्याम गावकर, राजमोहन शेट्ये, अनंत जोशी, राजू नाईक, जॉन आगियार, दुर्गाकुमार नावती, प्रदीप नाईक, प्रकाश क्षीरसागर, विठ्ठल शेळके यांचा सहभाग होता.

त्यानंतर प्रा.पौर्णिमा केरकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘काव्यपंचमी’ कविसंमेलन झाले. यात मीना समुद्र, सृष्टी नाईक, इंदू परब, नीता तोरणे, प्रमोद कारापूरकर, नूतन दाभोळकर, सुभाष शाह, दीपा मिरिंगकर, सुनीता शाह, सुनेत्रा कळंगुटकर, आरती मोने, मेघना कुरुंदवाडकर, अक्षता किनळेकर, सारिका अडविलकर, तृप्ती बांदेकर, स्नेहा सुतार, गीता गावस, अंजली चितळे, चित्रा क्षीरसागर, धनश्री कुरुंदवाडकर, वर्षा प्रभुगावकर, शर्मिला प्रभू, तेजश्री प्रभुगावकर, श्‍‍वेता गावस, कविता आमोणकर, अनुया शिरोडकर, मंदा सुगीरे व कवींचा सहभाग होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT