Shripad Naik  Dainik Gomantak
गोवा

PM Oath Ceremony: श्रीपाद नाईकांना लागली लॉटरी; मोदी सरकार-3 मध्ये घेणार शपथ?

Shripad Naik: यंदाच्या लोकसभा निवडणूकीत उत्तर गोव्यातून विक्रमी मताधिक्याने विजयी झालेल्या श्रीपाद नाईंकांना लॉटरी लागली आहे.

Manish Jadhav

PM Oath Ceremony: नरेंद्र मोदींचा आज शपथविधी सोहळा पार पडत आहे. मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. देशाचे पहिले पतंप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा शपथ घेणारे मोदी दुसरे नेते ठरणार आहेत. मोदींच्या कॅबिनेटमध्ये कोणाची वर्णी लागणार? कोणाचा पत्ता कट होणार? यासंबंधीच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होत्या. मात्र, आज सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणूकीत उत्तर गोव्यातून विक्रमी मताधिक्याने विजयी झालेल्या श्रीपाद नाईकांना लॉटरी लागली आहे. नाईक पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. नरेंद्र मोदींच्या मागील काही सरकारमध्येही नाईक मंत्री होते. आता पुन्हा एकदा त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार आहे. छोट्याशा गोव्याचे प्रतिनिधित्व मोदी कॅबिनेटमध्ये दिसणार आहे.

दरम्यान, ही बातमी येताच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचीही प्रतिक्रीया आली. मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये श्रीपाद भाऊंच्या रुपाने गोव्याला प्रतिनिधित्व मिळत आहे. या गोष्टीचा मला आनंद आहे. याचा फायदा गोवा सरकार तसेच समस्त गोवेकरांना होणार आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

याशिवाय, नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या नाईकांना दिल्लीतील निवासस्थानी मंत्री सुदीन ढवळीकर, मंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री अलेक्स सिक्वेरा आणि आमदार दिगंबर कामत यांनी शुभेच्छा दिल्या.

यंदाची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी खास ठरली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला तिसऱ्यांदा सत्ता राखण्यात यश आले. परंतु यंदा भाजपला 2014 आणि 2019 सारखे बहुमत मिळवता आले. भाजपला सत्ता स्थापनेसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची साथ घ्यावी लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Russian Rescued: घनदाट जंगलात गुहेत आढळली रशियन महिला! गोवामार्गे पोचली गोकर्ण येथे; कारण ऐकून पोलीस झाले थक्क

Goa Farmers: ऊस उत्पादकांसाठी महत्वाची बातमी! प्रतिहेक्टर अर्थसाहाय्य योजना होणार बंद; यंदापासून प्रतिमेट्रीकनुसार भाव

Rashi Bhavishya 13 July 2025: आर्थिक व्यवहारात फायदा, नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल; जाणून घ्या तुमच्या राशीचं भविष्य

Paliem: पूर्वजांनी नवदुर्गेचे नाव घेत, कष्टाने निर्माण केलेला पाचूचा 'पाळी' गाव

KL Rahul Century: लॉर्ड्सच्या मैदानावर राहुलची बादशाही, आशियात कुणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं

SCROLL FOR NEXT