PM Oath Ceremony Dainik Gomantak
गोवा

PM Oath Ceremony : गोव्याचे मंत्री-आमदार सोहळ्यासाठी दाखल

PM Oath Ceremony : : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, उत्तर गोव्यातील विजयी उमेदवार श्रीपाद नाईक हे आधीच दिल्लीला पोचले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

PM Oath Ceremony :  :

पणजी, केंद्र सरकारच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी गोव्याचे मंत्री आमदार, तसेच भाजप नेते-पदाधिकारी दिल्लीला रवाना झाले आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, उत्तर गोव्यातील विजयी उमेदवार श्रीपाद नाईक हे आधीच दिल्लीला पोचले आहेत. माजी आमदार दामू नाईक आणि सिद्धार्थ कुंकळ्येकर हे शुक्रवारी सायंकाळी उशिरा दिल्लीत दाखल झाले. शनिवारी दुपारनंतर मंत्री सुदिन ढवळीकर दिल्लीत पोचले. मंत्री माविन गुदिन्हो, सुभाष शिरोडकर, विश्वजीत राणे, रोहन खंवटे, नीळकंठ हळर्णकर शनिवारी रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाले.

...हे आमदार-मंत्री अनुपस्थित

मंत्री गोविंद गावडे आणि आमदार दिव्या राणे यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देऊन दिल्ली दौरा टाळला आहे. पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर आणि महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात विदेशात असल्याने ते दिल्लीत पोचू शकणार नाहीत.

मायकल लोबो आणि दिलायला लोबो यांनी दिल्लीला येणार नसल्याचे पक्षाला कळविले आहे. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट हे सध्या हिमाचल प्रदेशात आहेत. त्यांना तेथून दिल्लीला जाण्याची व्यवस्था होत नसल्याने ते शपथविधी सोहळ्याला पोचण्याची शक्यता कमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT