Mopa Airport
Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: मोपावर पहिल्या लँडिंगचा मान कुणाला, लवकरच 'या' खास व्यक्तीचे उतरणार विमान

Pramod Yadav

गोव्यातील मोपा विमानतळाच्या (Mopa Airport) उद्धाटनाची उत्सुकता शिगेला लागली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या विमानतळाचे 11 डिसेंबर रोजी उद्धाटन करणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून मिळत आहे. राज्यात होणाऱ्या आयुर्वेद काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थिती लावणार आहेत, याच वेळी पंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे उद्धाटन होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मोपावर पहिल्या लँडिंगचा मान कुणाला?

मोपाच्या उद्धाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थिती लावणार आहेत. मोपावर पहिल्या लँडिंगचा मान देखील पंतप्रधान मोदींचाच असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एअर इंडिया वन हे मोपा उतरणार पहिले विमान ठरणार आहे. मोपावर लँड झाल्यानंतर मोदी येथून चॉपरमधून गोवा विद्यापीठातील आयुर्वेद काँग्रेसच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी आयुष हॉस्पिटल आणि इतर दोन प्रकल्पांचे उद्धाटन करणार आहेत. या कार्यक्रमांनंतर मोदी मोपावर येऊन विमानतळाचे उद्धाटन करणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांकडून मिळत आहे.

मनोहर पर्रीकर यांच्या नावाचा केंद्राला प्रस्ताव

मोपा विमानतळाला कुणाचे नाव देण्यात यावे याबाबत गोव्यात अनेक दिवस वाद पाहायला मिळाला. यात गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर, विरोधी पक्षनेते जॅक सिक्वेरा आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याबाबत प्रस्ताव समोर आले होते. दरम्यान, मोपा नावावरून झालेल्या वादावर आता पडदा पडला असून, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव मोपा विमानतळाला देण्यात यावे असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला पाठवला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिकृत घोषणा करणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गासाठी राज ठाकरेंचं भर सभेत मोदींकडं साकडं

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

Swati Maliwal Assault Case: 'भाजपने षड्यंत्राचा भाग म्हणून स्वाती मालीवाल यांना...', 'आप' नेत्या आतिशी यांचा घणाघात

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT