PM Modi Mopa Inauguration Dainik Gomantak
गोवा

PM Modi Mopa Inauguration : ''गोयांत येवून माका खूब खोस भोगता'' मोदींनी भाषणाला सुरुवात केली अन् एकच जल्लोष

भारत जगातील तिसरी मोठी हवाई वाहतूक बाजारपेठ

दैनिक गोमन्तक डिजिटल

मोपा’ या 13 व्या आंतरराष्ट्रीय ग्रीन फिल्ड प्रकल्पाचे लोकार्पण आज ( 11 डिसेंबर रोजी ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित करताना कोकणी भाषेत सुरुवात करत ''गोयांत येवून माका खूब खोस भोगता'' ( गोव्यात येऊन मला आनंद झाला ) या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात साथ दिली.

(PM Narendra Modi inaugurates Manohar International Airport, Mopa in Goa)

या कार्यक्रमात पंतप्रधानांनी मोपा विमानतळाचे लोकार्पण करत, नामकरण 'मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ' करण्यात येत असल्याची घोषणा केली. व गेल्या आठ वर्षात देशात जवळपास 72 नवी विमानतळे तयार झाली. स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात केवळ 70 विमानतळे आणि आमच्या 8 वर्षांच्या काळात नवीन 70 हून अधिक विमानतळे नागरीकांच्या सेवेसाठी लोकार्पित केल्याचे ते म्हणाले.

भारत जगातील तिसरी मोठी हवाई वाहतूक

भारत जगातील तिसरी मोठी हवाई वाहतूक बाजारपेठ बनली आहे. एअरकनेक्टिव्हिटी विस्तारेल तसा हवाईप्रवास सर्वांना सोयीचा होत चालला आहे. एकविसाव्या शतकातील भारत हा नवा भारत आहे. वैश्विक पातळीवर भारत नवी प्रतिमा रूजवत आहे, त्यामुळे जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. असे देखील पंतप्रधान यावेळी म्हणाले.

भाई मनोहर पर्रीकर आपल्याला आशिर्वाद देत असतील

मोपा उद्घाटन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्याचा नागरीक आणि मुख्यमंत्री म्हणून माझ्यासाठी हा भावनिक क्षण. भाई मनोहर पर्रीकर आपल्याला आशिर्वाद देत असतील. अटल ब्रिज असो की हायवे असो, पर्रीकरांच्या कारकिर्दीत गोव्याच्या विकासाला खरी सुरूवात झाली. आणि त्यांचेच नाव या प्रकल्पाला दिल्याचा माझ्यासह समस्त गोमंतकीयांना आनंद झाला असल्याचे ते म्हणाले.

''गोव्याच्या प्रगतीत मोपा मैलाचा दगड''

मोपा विमानतळ उद्घाटनप्रसंगी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, देशातील विमानतळांची संख्या 220 पर्यंत नेणार. या प्रवासात मोपा विमानतळ मैलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे गोमंतकियांनी याचे भागीदार व्हावे असे ही शिंदे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

SCROLL FOR NEXT