गोवा राज्यातील किनारी भागातमध्ये खुल्या जागेत रात्री 10 नंतर कोणत्याही प्रकारची संगीत पार्टी आयोजित करण्यावर उच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे 10 वाजल्यानंतर कोणत्याही प्रकारची संगीत पार्टी केल्यास कारवाई केली जात आहे. असे असताना गोवा राज्यात काही ठिकाणी संगीत पार्ट्या सुरुच आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गोवा दौऱ्यावर असल्याने हा विषय आता चर्चेचा मुद्दा ठरत आहे. यावरुन स्थानिक नागरीकांनी देखील संताप व्यक्त केला आहे.
(Prime Minister Narendra Modi is visiting in Goa and illegal night parties are going on at Calangute beach )
गोवा राज्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या संगीत पार्ट्यांवर कारवाई सुरु आहे. यातच आता कळंगुट किनाऱ्यावर देखील रात्रीची छम छम सुरुच असल्याचा प्रकार समोर आला आहे. कळंगुट स्थानिक नागरीकांनी एका ह़ॉटेलमध्ये ( ह़ॉटेलचे नाव समजू शकलेले नाही ) जात सुरु असणाऱ्या पार्टीचा व्हिडिओ केला आहे. यामध्ये स्पष्टपणे रात्री 11 वाजता मोठ्या आवाजात सुरु असलेली गाणी अन् त्यावर बेभान होत थिरकणारे युवा - युवती दिसत आहेत.
याबाबत बोलताना एका नागरीकाने म्हटले की, गेल्या चार दिवसांपासून हा प्रकार सुरु आहे. हॉटेल मालक हे स्थानिक नाहीत. ते परराज्यातील आहेत. त्यामुळे स्थानिकांबाबत त्यांना काही वाटत नाही. ते केवळ आपल्या फायद्याचा विचार करतायेत. यामुळे स्थानिकांना होणारा त्रास याबद्दल त्यांना काही वाटत नसल्याचं म्हटले आहे.
स्थानिकांपैकी एका महिलेने तोंड लपवणाऱ्या हॉटेलमधील युवतींना विचारले की अशा प्रकारे सामान्य नागरीकांना त्रास देत तुम्ही पार्ट्या करता तर तुम्हाला काही वाटते की नाही. असा सवाल केला यावेळी पार्टीतील युवतींनी तोंड लपवत कॅमेऱ्यापासून दुर जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोव्यातील छम छम थांबणार की नाही. हे आता येणार यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.