PM Narendra Modi  Dainik Gomantak
गोवा

PM Applaud Goa: पंतप्रधान मोदींकडून गोव्यातील किनारपट्टी स्वच्छता अभियानाचे कौतुक

मिरामार, बायणा, कोलवा, बोगमाळो आणि वेळसाव हे पाच बीच या स्वच्छता मोहिमेचे भाग होते

गोमन्तक डिजिटल टीम

पंतप्रधान मोदी यांनी रविवारी देशाला उद्देशून मन बात (Mann Ki Baat) या कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यामध्ये किनारपट्टी स्वच्छतेचा (Coastal Clean-up Day) देखील उल्लेख त्यांनी केला. यावेळी गोव्यासह (Goa) देशातील इतर राज्यात राबविलेल्या किनारपट्टी स्वच्छता अभियानाचे नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. 'स्वच्छ आणि सुरक्षित सागर' ही मोहीम मानव आणि जलचर या दोघांसाठी महत्वाची आहे असे नरेंद्र मोदी यांनी आपल्या संभाषणात नमूद केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताचे हे सौभाग्य आहे की, देशाला 7,500 कि.मी मोठी समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. भारताच्या अनेक राज्य आणि द्वीप समूहांना ही किनारपट्टी स्पर्श करते. भारताच्या विविधतेचे हे द्योतक आहे. पण, सागरी क्षेत्र पर्यावरण संबधित समस्यांचा सामना करत आहे. वातवरण बदल समुद्र किनारपट्टीसाठी धोकादायक बनत चालला आहे. बीचवरील कचरा आणि अस्वच्छता आपल्या सर्वांसाठी अडचणीचा विषय ठरत आहे. यावर सर्वांनी एकत्र प्रयत्न करणे गरजेचे आहे."

"मला यासाठी स्वच्छ सागर, सुरक्षित सागर या अभियानाबाबत बोलायचे आहे. 5 जुलै रोजी किनारपट्टी स्वच्छता अभियान सुरू झाले व 17 सप्टेंबर रोजी त्याचा समारोप झाला. याच दिवशी किनारपट्टी स्वच्छता दिवस देखील साजरा केला जातो. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सुरू झालेले हे अभियान 75 दिवस सुरू राहिले. गोवा यासह विविध राज्यात किनारपट्टीवर स्वच्छता करण्यात आली. गोव्यात मोठी मानवी साखळी करण्यात आली. काकीनाडा येथे गणपती विसर्जानावेळी प्लास्टिकच्या दुष्परिणामाबाबत लोकांना माहिती देण्यात आली."

"एनएसएसच्या 500 स्वयंसेवकांनी जवळपास तीस टन पेक्षा अधिक प्लास्टिक गोळा केले. ओडिसात तीन दिवसात वीस हजार शालेय विद्यार्थ्यांनी आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्याची शपथ घेतली." आपला परिसर आणि समुद्र किनारपट्टी स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करने आवश्यक असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

सागरी किनारे स्वच्छता मोहिम ही आंतरराष्ट्रीय मोहिमेअंतर्गत, भारत सरकराने गोव्यातील पाच बीच यासाठी निवडले होते. मिरामार, बायणा, कोलवा, बोगमाळो आणि वेळसाव (Bogmalo, Baina And Velsao) हे पाच बीच या स्वच्छता मोहिमेचे भाग होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी मिरामार बीचवर उपस्थिती लावत स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. याचवेळी भव्य मानवी साखळी करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT