Goa Former CM Laxmikant Parsekar Visit Ayodhya Dainik Gomantak
गोवा

Laxmikant Parsekar: बांगलादेशचा प्रश्नही मोदी सोडवतील; गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी घेतले रामल्लाचे दर्शन

Goa Former CM Laxmikant Parsekar Visit Ayodhya: राम मंदिराचे निर्माण करणारे पंतप्रधान मोदी बांगलादेशचा प्रश्नही सोडवतील. मोदी है तो मुमकिन है, असे पार्सेकर म्हणाले.

Pramod Yadav

अयोध्या; गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी अयोध्येत राम लल्लाचे दर्शन घेतले. यावेळी पार्सेकरांनी वन नेशन वन इलेक्शनला पाठिंबा दिला. वन नेशन वन इलेक्शनमुळे वेळेसोबतच पैशांचीही बचत होईल, असे पार्सेकर म्हणाले. केंद्र सरकारचा हा चांगला निर्णय आहे. यामुळे निवडणुकीदरम्यान वाया जाणारा वेळ आणि पैसा वाचेल.

बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत माजी मुख्यमंत्री पार्सेकर म्हणाले की, सरकारला याची काळजी आहे. आमचे सर्वोच्च नेतृत्व, राम मंदिराचे निर्माण करणारे पंतप्रधान मोदी बांगलादेशचा प्रश्नही सोडवतील. मोदी है तो मुमकिन है.

गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या कथित टिप्पणीवर लक्ष्मीकांत म्हणाले की, ही विरोधकांची निराशा बाहेर पडत आहे. राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे.

कोणाच्या तरी भाषणातून एक-दोन ओळी काढून त्याची पार्श्वभूमी अंधारात ठेवून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पार्सेकर म्हणाले. हे सर्व मुद्दाम घडवून आणले जात आहे आणि ते करणाऱ्यांनाही माहीत आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री रामलल्लाच्या दर्शनासाठी कुटुंबासह अयोध्येत पोहोचले होते. दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध घडामोडींवर भाष्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT