Goa Congress: "अमित शहा राजीनामा द्या!" वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर गोवा काँग्रेसची मागणी

Amit Shah Controversy: गोवा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केंद्रीय गृहमंत्री महित शहा यांना बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी केली आहे
Amit Shah Controversy: गोवा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी  केंद्रीय गृहमंत्री महित शहा यांना बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी केली आहे
Goa Congress against Amit ShahDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतीत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भाजप आणि काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये वाद उफाळून आला आहे. संसदेच्या भाषणात बोलताना गृहमंत्र्यांनी 'सध्या काहीही झालं तरी आंबेडकर असं नाव पुढे केलं जातं, या जागी जर का देवाचं नाव घेतलं असतं तर किमान स्वर्गप्राप्ती झाली असती' असं विधान केलं होतं.

शहांच्या वादग्रस्त वक्तव्यावर त्यांनी त्वरित माफी मागावी तसेच त्यांना बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी काँग्रेसकडून केली जातेय. मात्र 'काँग्रेस पक्ष माझ्या विधानाचा त्यांच्या सोयीने वापर करतोय' असा पलटवार केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलाय. या प्रकरणावर सध्या गोव्यात देखील काँग्रेस पक्षाकडून संताप व्यक्त केला जातोय.

Amit Shah Controversy: गोवा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी  केंद्रीय गृहमंत्री महित शहा यांना बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी केली आहे
Dr Babasaheb Ambedkar: सातारा ते लंडन, प्राथमिक शाळा ते कोलंबिया विद्यापीठ; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक पदव्यांची यादी व्हायरल

गोवा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी काही काँगेसच्या कार्यकर्त्यांसह केंद्रीय गृहमंत्री शहा यांना बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी केली आहे, एवढंच नाही तर अमित शहा यांनी सर्वांसमक्ष याबद्दल माफी मागावी अशी असं म्हणत अमित पाटकर यांनी मुद्दा उचलून धरला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा राहुल गांधींनी विरोध केला.आक्षेप घेताना राहुल गांधींनी आंबेडकरांना भारताच्या संविधानाचा जनक म्हणत त्यांच्यामुळेच आज देशाला एक दिशा प्राप्त झाल्याचं वक्तव्य केलं होतं आणि यानंतर दोन्ही पक्षांमध्ये तसेच त्यांच्या समर्थकांमध्ये वाद उफाळून आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com