PM Modi Dainik Gomantak
गोवा

मडगावातील मोदींच्या सभेला महाराष्ट्रातून जमवली गर्दी, पहिल्यांदाच पंतप्रधानांची बस स्टँडवर सभा - काँग्रेस

PM Modi Visit To Goa: उच्च शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकाने सरकारी खर्चावर पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभेसाठी गर्दी जमवण्याबाबत भाजप सरकार करत असलेली धडपड उघड झाली आहे.

Ganeshprasad Gogate

PM Modi Visit To Goa: मडगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेला लोकांच्या अल्प प्रतिसादामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोव्यातील भ्रष्ट भाजप सरकार हैराण झाले आहे.

सभागृह भरगच्च दिसण्यासाठी सरकारने गर्दी जमवण्याच्या हेतूने राज्यासह लगतच्या महाराष्ट्रातून - सिंधुदुर्गातून लोकांना सभास्थळी आणले जात असल्याचा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.

20 हजार क्षमतेचे पंडित नेहरू स्टेडियम फक्त 500 मीटर अंतरावर असतानाही पंतप्रधान बस स्टँडवर सभेला संबोधित करण्याची ही पहिलीच वेळ असल्याची बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.

उच्च शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकाने सरकारी खर्चावर पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभेसाठी गर्दी जमवण्याबाबत भाजप सरकार करत असलेली धडपड उघड झाली आहे.

विद्यार्थ्यांना राजकीय सभेला उपस्थित राहण्यासाठी तयार केलेल्या परिपत्रकाचा निषेध करतो. भाजपने बेशरमीची हद्द ओलांडली असल्याचे पाटकर म्हणाले.

भारत विकास रॅलीच्या प्रचार साहित्यात दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दिन यांचा समावेश नाही. हा दक्षिण गोव्यातील जनतेचा अपमान आहे.

2019 मध्ये भाजपला मत न दिल्याने दक्षिण गोव्यातील जनतेला अपमानीत करण्याची संधी भाजपने घेतली असल्याचा दावा अमित पाटकर यांनी केला.

तसेच मोदींनी गोव्यात आणखी दहा सभा घेतल्या तरी आगामी निवडणुकीत काँग्रेस लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकेल, असा विश्वास अमित पाटकर यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT