PM Modi In Goa Dainik Gomantak
गोवा

PM Modi In Goa : जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू; गोव्यातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

PM Modi In Goa : नरेंद्र मोदी यांची ही मुरगाव तालुक्यातील पहिलीच जाहीर सभा होती. या सभेला ५० हजारांची उपस्थिती लावण्यासाठी मागचे काही दिवस स्थानिक भाजप नेत्यांना कामाला लावले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

सुशांत कुंकळयेकर

PM Modi In Goa :

सांकवाळ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची सभा गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांना ‘चार्ज’ करणारी ठरली. मोदी यांचे प्रभावी भाषण कार्यकर्त्यांना भारावून सोडणारे होते.

इथला पूर्ण माहोल ‘मोदीमय’ झाला होता. कार्यकर्ते ‘मोदी मोदी’ असा जयजयकार करत होते.

नरेंद्र मोदी यांची ही मुरगाव तालुक्यातील पहिलीच जाहीर सभा होती. या सभेला ५० हजारांची उपस्थिती लावण्यासाठी मागचे काही दिवस स्थानिक भाजप नेत्यांना कामाला लावले होते. आज ती संख्या गाठली गेल्याने भाजप नेत्यांच्या तोंडावरही समाधान दिसत होते. सभा यशस्वी करण्याचे शिवधनुष्य मुखमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उचलले होते. त्यांना राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे

एक बँक लुटारु, दुसरा देशद्रोही

मंत्री विश्‍‍वजीत राणे यांचाही पाठिंबा मिळाला. नरेंद्र मोदी व्यासपीठावर आले त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सावंत यांचे कौतुक केलेच, शिवाय विश्‍‍वजीत राणे यांचीही पाठ थोपटली. या सभेला झालेली गर्दी पाहून मोदी यांनी ‘ही प्रचार सभा की

विजय सभा’ असे गौरवोद्‌गार काढले.

ही सभा यशस्वी करण्यासाठी पंचायतमंत्री माविन गुदिन्‍हो, वास्कोचे आमदार दाजी साळकर आणि मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनीही बरेच कष्‍ट घेतले. आजची लोकांची उपस्थिती पाहून त्यांच्याही चेहऱ्यावर समाधान पसरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT