Goa News : गोव्याचे प्रश्न मांडणारा खासदार हवा : रमाकांत खलप

Goa News : ओबीसी, एसटींचा विचार केला नाही, अशी टीका इंडिया आघाडीचे उमेदवार रमाकांत खलप यांनी माशेलातील जाहीर सभेत केला.
Goa
Goa Dainik Gomantak

Goa News :

खांडोळा, लोकसभेत गोव्याच्या विकासाचे, जनकल्याणाचे प्रश्न मांडणारा खासदार हवा. लोकसभेत श्रीपाद भाऊ मोदीपेक्षांही ज्येष्ठ असूनही गेल्या अनेक वर्षांत कोणत्याही मुद्द्यावर चर्चा केली नाही; शिवाय गोव्याच्या विकासासाठी काहीही केले नाही.

ओबीसी, एसटींचा विचार केला नाही, अशी टीका इंडिया आघाडीचे उमेदवार रमाकांत खलप यांनी माशेलातील जाहीर सभेत केला.

यावेळी काँग्रेसचे गिरीश चोडणकर, तृणमूलचे समील वळवईकर, आमदार कार्लुस फेरेरा, अमित पाटकर, गुरू कोरगावर, रामराव वाघ, कांता गावडे, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, अमरनाथ पणजीकर, एम, के. शेख, रामकृष्ण जल्मी व्यासपीठावर उपस्थित होते. खलप पुढे म्हणाले, ओबीसी, एसटीसाठी अनेक योजना करता येतात, राजकीय आरक्षणही देणे शक्य आहे.

Goa
Goa Accident: गिरीत उड्डाण पुलावरून खाली कोसळला मालवाहू ट्रक; एक कामगार ठार, दोन जखमी Watch

पण भाजपने काहीच केले नाही, अनेक वर्षे उत्तरेतून नेतृत्व करणाऱ्यांनीही या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. राज्यातील पूलाला भाऊसाहेबांचे नाव दिले नाही, तसेच पर्रीकरांचेही नाव दिले नाही. भाजप सरकारने कूळ- मुंडकार कायद्याची अंमलबजावणीही केली नाही. शिवाय राज्यातील जमिनीचे रक्षण करण्यातही ते अपयशी ठरले आहेत.

अमित पालेकर, अमित पाटकर, समिल वळवईकर, कार्लुस फेरेरा यांनी गोमंतकीयाच्या हिताच्या दृष्टीने कार्य करण्यात भाजप खासदारांना आलेल्या अपयशाचा पाढा वाचला. भाजपकडून फक्त गोमंतकीयांची दिशाभूल केली जाते. म्हादई प्रकरणी राजिनामा देतो, म्हणणारे श्रीपाद नाईक काहीच करू शकले नाहीत, ते गप्पच आहेत. भाजप सरकार हे बहुजन विरोधी म्हणून इंडिया ला उत्तरेत चांगला प्रतिसाद लाभत असून विजयाची खात्री असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

देवदेवता विरोधी भाजप

दिगंबर कामतासह काँग्रेस आमदारांनी मंदिरात जाऊन शपथ घेतली होती. त्या फुटिरांना भाजपने आपल्या पक्षात घेतले. देवदेवता, हिंदुत्वाच्या गप्पा मारणाऱ्यांनी तडजोड केली, याचा अर्थ ते देवदेवतांना मानत नसावेत. तसेच माध्यम प्रश्नावर मंदिरात गाऱ्हाणी घालणाऱ्यांनीही नंतर घुमजाव केला आणि पूर्वीच्या सरकारचे भाषा धोरण आजही सुरू ठेवले आहे, असा टोला गिरीश चोडणकर यांनी मारला.

खलप म्हणजे सिंह!

उत्तर गोव्यासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार रमाकांत खलप म्हणजे आमच्यासाठी सिंह आहेत. त्यांचे कार्य सिंहासारखे असून लोकसभेतील त्यांचे १८ महिन्याचे उल्लखनीय कार्य आहे. गोमंतकीयांच्या कल्याणासाठी, विकासासाठी त्यांना लोकसभेत पाठविणे ही गोमंतकीयांची जबाबादरी आहे, असे आमदार कार्लुस फेरेरा यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com