PM Modi Dainik Gomantak
गोवा

PM Modi Goa Visit: दुकाने, मार्केट 6 फेब्रुवारीला बंद; PM मोदींच्या सभेसाठी दक्षिण गोव्यात सुरक्षा वाढवली

PM Modi Goa Visit: शाळा-कॉलेजांनाही विशेष सूचना

Ganeshprasad Gogate

PM Modi Goa Visit: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या वेळी सुरक्षेचा उपाय म्हणून सभास्थळी असलेली सर्व दुकाने आणि मार्केट उद्या 6 फेब्रुवारी रोजी बंद ठेवण्याचाआदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे.

जिल्हाधिकारी आश्विन चंद्रू यांनी आज एक आदेश जारी करून मडगाव कदंब बस स्थानक परिसरातील मासळी मार्केट, भाजी मार्केट , गाडे आणि इतर आस्थापने बंद ठेवण्याचा आदेश जारी केला.

दरम्यान मडगाव शहरातील उच्च माध्यमिक विद्यालये आणि महाविद्यालये दुपारी 12 वाजेपर्यंत उघडी ठेवावीत आणि नंतर दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेला पाठवावे असा आदेश उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर यांनी जारी केला आहे.

सभेला येणाऱ्या विद्यार्थ्याच्या जेवणाची सोय सभा ठिकाणीं केली जाईल असे या आदेशात म्हटले आहे.

उद्या म्हणजेच मंगळवारी 6 फेब्रुवारीला मडगाव येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेन्द्र मोदींच्या सभेसाठी भाजपने जय्य्त तयारी केली असून सुरक्षेवर विशेष भर दिला आहे. मोदी राज्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन करतील.

त्यानंतर मडगावमध्ये त्यांची भव्य सभा होणार आहे. या सभेला सुमारे 50 हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केली आहे.

मोदी ज्या मार्गावरुन प्रवास करणार आहेत त्या राष्ट्रीय महामार्ग 17 च्या हद्दीत येणाऱ्या गावांना गट विकास अधिकाऱ्यांच्यावतीने पंचायतींना मेमो सादर करण्यात आला आहे.

महामार्गावर भटके कुत्रे, गायी येणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच, महामार्गालगत कचरा टाकू नये अशीही सूचना करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT