Children's sports meet in Mayem Dainik Gomantak
गोवा

Mayem: ‘गाव तिथे क्रीडामैदान’ आवश्‍‍यकच; मये बाल क्रीडामेळावा उद्‌घाटनावेळी तानावडेंची प्रतिक्रिया

Children's sports meet in Mayem: माजी सभापती स्व. अनंत विष्णू शेट स्मृती मये मतदारसंघ मर्यादित बालक्रीडा मेळाव्याच्या उद्‌घाटन सोहळ्यात तानावडे प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

Sameer Panditrao

डिचोली: क्रीडा क्षेत्रात भवितव्य घडवून स्वतःसह देशाचे नाव उज्ज्‍वल करण्याची संधी मुलांकडे असते. म्‍हणूनच मुलांच्या अंगभूत क्रीडागुणांना वाव देण्यासाठी गाव तिथे क्रीडामैदान असायलाच हवे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केले.

माजी सभापती स्व. अनंत विष्णू शेट स्मृती मये मतदारसंघ मर्यादित बालक्रीडा मेळाव्याच्या उद्‌घाटन सोहळ्यात तानावडे प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. त्‍यांच्‍या हस्‍ते व आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या उपस्थितीत क्रीडा ध्वज फडकावून, मशाल प्रज्वलित करून या क्रीडा मेळाव्याचे उद्‌घाटन करण्‍यात आले.

आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले की, मुलांना पुढे येण्यासाठी बाल क्रीडा मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष शंकर चोडणकर, जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत, भाजपचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष दयानंद करबोटकर, भाजप मंडळ अध्यक्ष संदेश पार्सेकर, प्रिया शेट मेळाव्याच्या आयोजन समितीचे अध्यक्ष विशांत नागवेकर यांच्यासह मये मतदारसंघातील विविध पंचायतीचे सरपंच आणि पंचसदस्य उपस्थित होते. समृद्धी गणपुले हिने सूत्रसंचालन केले.

३०० हून अधिक विद्यार्थी सहभागी

केळबाय मैदानावर आयोजित या क्रीडा मेळाव्यात मये मतदारसंघातील २२ प्राथमिक शाळांतील मिळून ३०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. विठ्ठलापूर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुंदर कवायत नृत्य सादर केले. यावेळी घेण्यात आलेल्या विविध मैदानी खेळांमध्‍ये मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT