Plaster Collapsed in Margao Dainik Gomantak
गोवा

Plaster Collapsed in Margao : मडगावात जुन्या इमारतीचं प्लास्टर कोसळलं; रस्त्यावरील कारचं मोठं नुकसान

या दुर्घटनेत एका मुलीलाही किरकोळ मार लागल्याची माहिती प्राथमिक माहिती आहे.

सुशांत कुंकळयेकर

Plaster Collapsed in Margao : मडगाव शहरातील अत्यंत गजबजलेला भाग असलेल्या पिंपळ कट्ट्याजवळ असलेल्या एका जुन्या इमारतीच्या गॅलरीचे सिमेंट प्लास्टर तुटून खाली कोसळलं. या घटनेत खाली पार्क करून ठेवलेल्या एका गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या दुर्घटनेत एका मुलीलाही किरकोळ मार लागल्याची माहिती प्राथमिक माहिती आहे.

मडगाव शहरातील पिंपळ कट्ट्याजवळ बँक ऑफ बडोडाची शाखा आहे. याच इमारतीच्या गॅलरीचा काही भाग तुटून खाली रस्त्यावर पडला. ही घटना शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या आसपास घडल्याची माहिती आहे. दुपारच्या वेळेला या भागात वर्दळ कमी प्रमाणात असते. त्यावेळीच हा भाग कोसळल्याने सुदैवाने फारशी हानी झाली नाही. या प्रकरणी मडगाव नगरपालिकेने त्वरित लक्ष घालावे अशी मागणी सध्या स्थानिकांमधून केली जात आहे.

दरम्यान जीर्ण इमारतींचा प्रश्न गोव्यात सध्या चांगलाच तापण्याची शक्यता आहे. कारण काही महिन्यांपूर्वीच वास्कोतही अशाच प्रकारची घटना घडली होती. वास्को मार्केटजवळील जीर्ण इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला होता. मात्र यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. या घटनेनंतर अनेकांनी कमकुवत आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT