मडगाव : खारेबांध - मडगाव येथे हॉटेल रविराज समोर असलेले फरशा घालून बंद केलेले गटार ट्रकच्या वजनाने कोसळण्याने भर बाजारात एक मालवाहू ट्रक कोसळण्याची घटना घडली. हा ट्रक जवळ पार्क केलेल्या कारवर कोसळल्याने त्या कारचीही बरीच हानी झाली.
ही घटना आज मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास घडली. हा ट्रक बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या मोठ्या आकाराच्या विटांनी भरला होता. त्यामुळे त्यात बरेच वजन होते. हा ट्रक मडगावातील हॉटेल रविराजकडे आणून ठेवला होता. त्याखाली फरशा घालून बंद केलेले गटार होते. ट्रकच्या वजनाने गटाराच्या फरशा तुटल्या आणि ट्रक गटारात गेला. हा ट्रक कलंडल्याने तो बाजूला पार्क केलेल्या कारवर पडला त्यामुळे कारचीही बरीच हानी झाली.
दरम्यान म्हापशातही रस्ता खचल्याची घटना नुकतीच घडली होती. पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन अचानकपणे फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली. या पाण्याच्या दबावामुळे गिरी-म्हापसा येथील सर्व्हिस रस्ता खचला व मोठा खड्डा पडला. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या पाईपलाइन दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. म्हापशाला येणारी वाहनेही हायवेवरून वळवण्यात आली. तसेच साबांखाच्या पाणीपुरवठा विभागाने जेसीबीच्या साहाय्याने वाहिनी दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.