Margao Digambar kamat

 

Dainik Gomantak 

गोवा

मडगावचा सुनियोजित विकास हा कधी झालाच नाही...

माजी नगराध्यक्ष डोरिस टेक्सेरा यांचा आरोप

दैनिक गोमन्तक

मडगाव (Margao) : दिगंबर कामत (Digambar Kamat) हे गेली 27 वर्षे माडगावचे आमदार असूनही त्यांच्याकडून मडगावचा सुनियोजित विकास हा कधी झालाच नाही. त्यामुळे मडगाव गोव्याची आर्थिक राजधानी असूनही विकासाच्या बाबतीत मागेच राहिली, असा आरोप मडगावच्या माजी नगराध्यक्ष आणि मडगाव काँग्रेस मंडळाच्या माजी अध्यक्षा डोरिस टेक्सेरा यांनी केला.

सध्या तृणमूल पक्षात (TMC) प्रवेश केलेले कामत यांचे पूर्वीचे समर्थक डोरिस टेक्सेरा आणि नगरसेवक महेश आमोणकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कामत यांच्यावर आरोप केले. कामत यांनी मडगावची कशी वाट लावली हे मडगाव रेल्वे स्थानक परिसराला भेट दिल्यावर कळून येते. मडगाव हे गोव्यातील (Goa) प्रमुख जंक्शन असतानाही त्याला ओंगळवाणे स्वरूप आले आहे ते पाहिल्यास मडगावकरांना (Margao) लाजेने मान खाली घालावी लागते, असे टेक्सेरा म्हणाल्या.

महेश आमोणकर (Mahesh Amonkar) यांनी कामत यांनी मडगावकडे दुर्लक्ष केल्याने फातोर्ड्याचा विकास झाला, असा आरोप करून कामत यांच्याकडे मुस्लिमांच्या कब्रस्थानचा प्रश्नही सुटू शकला नाही, असा आरोप केला.

सोयी-सुविधांचा अभाव

मडगाव ही गोव्याची आर्थिक राजधानी असूनही या शहरात चांगले मार्केट नाही, चांगले उद्यान नाही, मैदानावर पुरेशा सोयी नाहीत, पार्किंगची व्यवस्था चांगली नाही. एव्हढेच नव्हे तर पुरेशा शौचालयांचीही सोय नसल्याने लोकांना त्रास सोसावे लागत असल्याचा आरोप टेक्सेरा यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT