पणजी: गोव्यातील सर्व प्रकल्पांच्या कामाचा दर्जा उत्तम आहे, झुआरी नदी पुलावर निरीक्षण मनोरे उभारण्याच्या प्रकल्पाची आज पायाभरणी झाली. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून निर्माण केलेला पूल हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. Nitin Gadkari
प्रदूषण कमी करून गोव्याला (Goa) जागतिक दर्जाच्या सुविधा असलेले प्रदूषणमुक्त (Pollution) राज्य म्हणून आकाराला आणता येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला. गोव्याला आधुनिक स्वरूप देण्यासाठी तळमळीने धडपड करणारे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Former CM Manohar Parrikar) यांची आणि त्यांच्या अथक प्रयत्नांची देखील गडकरी यांनी आठवण काढली. राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Goa Assembly) वारे वाहू लागले असून आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते अशी स्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने केलेल्या विकास प्रकल्पांच्या लोकार्पणाचा आणि नव्या प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा धडाका लावला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Highways Minister Nitin Gadkari) यांनी सुमारे 22 हजार कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. तर राज्य सरकारच्या 3840 कोटींच्या आठ कामांना मंजुरी देण्यात आली. यात दाबोळी विमानतळ ते वेर्ण मार्ग सिग्नल मुक्त करण्याच्या कामाचा समावेश आहे. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन आणि बंदर राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार विजय तेंडुलकर, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर उपस्थित होते.
लोकार्पण झालेले प्रकल्प
राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील पत्रादेवी ते करासवाडा या 18 किलोमीटर लांबीच्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम
मडगाव पश्चिम बायपास प्रकल्प
राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील करासवाडा ते बांबोळी या 13 किलोमीटर लांबीच्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम
मुरगाव बंदराला जोडणारा लूप-1 मार्ग
तीन प्रकल्पांची पायाभरणी
मोपा विमानतळाला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.1665ची उभारणी
झुआरी नदीवरील पुलावर निरीक्षण मनोऱ्यांची उभारणी
केंद्रीय पायाभूत सुविधा निधीतून होणारी मार्गांची 6 विविधकामे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.