Pink Rickshaws Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील कर्तबगार महिलांसाठी आता पिंक रिक्षा

रोजगाराची संधी: ईडीसीमार्फत मिळणार कर्ज; रोटरी क्लबचाही पुढाकार

दैनिक गोमन्तक

पणजी: महिलांच्या संरक्षणासाठी महिला पोलिस कर्मचारी असलेली पिंक फोर्स राज्यामध्ये सुरू केल्यानंतर आता येत्या काही दिवसांत पिंक रिक्षा लोकांना रस्त्यावर पाहायला मिळणार आहे. या पिंक रिक्षासाठी मुख्यमंत्री रोजगार योजनेखाली आर्थिक विकास महामंडळामार्फत (ईडीसी) सवलतीच्या दरात कर्ज तसेच रोटरी क्लबतर्फे मदत केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ईडीसीमधील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

‘स्वयंपूर्ण गोवा’ या उपक्रमांतर्गत सरकारतर्फे अनेकांना मुख्यमंत्री रोजगार योजनेमार्फत ईडीसी सहकार्य करत आली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रकल्प सुरू करून राज्यातील तरुण पिढीला प्रोत्साहीत करण्याचे काम केले जाईल, असे सावंत यांंनी स्पष्ट केले.

17 महिलांना प्रशिक्षण

रोटरी क्लबने सरकारच्या मदतीने महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातील 17 महिलांना प्रशिक्षण देणे सुरू झाले आहे. ही नाविन्यपूर्ण कल्पना असून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. यातून महिलांची रोजगाराची समस्या दूर होणार आहे.

महिलांचा प्रवास होणार सुखकर: यापूर्वी पर्यटन विकास महामंडळाने महिला चालक असलेल्या पर्यटन गाड्या सुरू केल्या होत्या. मात्र, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. सध्या या गाड्या रस्त्यावरही दिसत नाहीत. मात्र, आता पिंक रिक्षा या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध होणार असून विशेष करून महिलांचा प्रवास सुखकर होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT