Panjim News Dainik Gomantak
गोवा

Panjim News: पायलट संघटनेचा शनिवारी 43 वा वर्धापनदिन स्नेहमेळावा

Panjim News: गोवा मोटरसायकल टॅक्सी रायडर्स असोसिएशनचा 43 वा वार्षिक स्नेहमेळावा शनिवार, 23 डिसेंबर रोजी पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी वर्षभराच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

Panjim News: गोवा मोटरसायकल टॅक्सी रायडर्स असोसिएशनचा 43 वा वार्षिक स्नेहमेळावा शनिवार, 23 डिसेंबर रोजी पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी वर्षभराच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे.

पायलट व्यावसायासंदर्भात निर्माण झालेल्या व यापुढे ओढवणाऱ्या समस्यांवर चर्चा आणि त्यांच्या निवारणासाठी कोणकोणत्या उपाययोजना करणे शक्य आहे यावर चर्चा तसेच समाजाच्या विविध क्षेत्रात सामाजिक भावनेने सेवा बजावणाऱ्या मान्यवरांचा, पायलट बांधवाचा सन्मान करण्यात येणार आहे.

तसेच सभासदांच्या गुणवान मुलांचाही गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या सुरवातीस दीपप्रज्वन होईल. त्यानंतर दिवंगत सभासदांना श्रध्दांजली वाहण्यात येईल. नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संघटनेतर्फे वार्षिक स्मरणिकेचे विमोचन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास खास अतिथी म्हणून वाहतूक आणि पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, डीचोलीचे आमदार चंद्रकांत शेट्ये, ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सागर अग्नी, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते''सूर्यकांत सावंत तसेच संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित राहतील.

आमचे आश्रयदाते शुभचिंतक व पायलट परिवाराच्या कुटुंबीयांनी आर्वजून उपस्थित राहून स्नेहमेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी केलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT