Mining Issue In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: पिळगावचे शेतकरी एकवटले, वेदान्ता खाणीचा रस्ता अडवला; रस्त्यात उभारली झोपडी

Mining Issue In Goa: आमची शेतजमीन सुपीक करून आमच्या ताब्यात मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही; शेतकरी आक्रमक

गोमन्तक डिजिटल टीम

Mining Issue In Goa

डिचोली: 'खाण व्यवसायामुळे उद्ध्वस्त झालेली शेती सुपीक करून पूर्ववत आम्हाला द्या' या मागणीसाठी गेले वर्षभर संघर्ष करणारे पिळगावमधील शेतकरी पुन्हा एकदा संघटित झाले आहेत.

आक्रमक बनलेल्या या शेतकऱ्यांनी आजपासून (बुधवारी) 'रस्ता बंद' आंदोलन सुरू केले आहे. लाकडी कुंपण घालून सारमानस भागात वेदान्ताच्या खाणीवरील रस्ता अडवला. इतकेच नव्हे तर या शेतकऱ्यांनी रस्त्यावर चक्क झोपडीही उभारली.

'आमची शेतजमीन सुपीक करून आमच्या ताब्यात मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. रस्ता बंद आंदोलन चालूच राहणार, असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यातही शेतकऱ्यांनी अशाच प्रकारे रस्ता अडवला होता. त्यावेळी या मागणीसंदर्भात तोडगा काढण्याची ग्वाही प्रशासकीय पातळीवरून देण्यात आली होती. त्यामुळे त्यावेळचे आंदोलन शेतकऱ्यांनी मागे घेतले होते.

फेब्रुवारी महिन्यातील आंदोलनानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत आत्तापर्यंत प्रशासकीय पातळीवर अनेक बैठका झाल्या. मात्र सकारात्मक तोडगा निघत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेताना आज खाणीवरील रस्त्यावर अडथळे निर्माण केले. आजच्या आंदोलनासंदर्भात शेतकऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेला आगाऊ लेखी कल्पना दिल्याचे समजते.

आंदोलनावेळी पिळगावच्या सरपंच मोहिनी जल्मी यांच्यासह उज्ज्वला बेतकीकर, चेतन खोडगीणकर, स्वप्निल फडते हे पंचसदस्य उपस्थित होते.

खाण व्यवसाय सुरू झाल्यानंतर गावातील लोकांना रोजगार मिळणार या आशेने आम्ही शेतीवर पाणी सोडले. मात्र आता खाण कंपनीने गावावरच अन्याय केला आहे. खाण व्यवसायामुळे आमच्या शेतजमिनी नष्ट झाल्या आहेत. खाणमाती आदी गाळ साचून शेतजमिनी बुजल्या आहेत. त्यामुळे गेल्या बऱ्याच वर्षांपासून शेती पडीक पडल्या आहेत. खाण नुकसान भरपाईही धड मिळत नाही. आता तर 'वेदान्ता' (सेझा) खाण कंपनीने स्थानिक कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे.
सुधाकर वायंगणकर, पिळगाव

मामलेदारांकडून मध्यस्थीचे प्रयत्न

पिळगावमधील शेतकऱ्यांनी खाणीवरील रस्ता अडविल्याची माहिती मिळताच डिचोलीचे मामलेदार प्रवीण गावस आणि संयुक्त मामलेदार आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले.

मात्र शेतकरी आपल्या भूमिकेशी ठाम राहिले. शेतकऱ्यांनी मामलेदारांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. रस्त्याचा सर्व्हे केल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे मामलेदारांनी स्पष्ट केले. यावेळी मोठा पोलिस फौजफाटा तैनात होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT