गोव्यातून चक्क मृत व्यक्ती आला मुंबईत मतदानाचा हक्क बजावायला, पुढं काय घंडलं? वाचा मतदान केंद्रावरील ड्रामा
Polling Booth

Mumbai: गोव्यातून चक्क मृत व्यक्ती आला मुंबईत मतदानाचा हक्क बजावायला, पुढं काय घंडलं? वाचा मतदान केंद्रावरील ड्रामा

Maharashtra Assembly Election 2024: गोव्यातील अँथनी ब्रागांझा यांनी लोकसभा निवडणुकीला मतदानाचा हक्क बजावला होता.
Published on

Maharashtra Assembly Election 2024

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज (२० नोव्हेंबर) मतदान होत आहे. राज्यात सर्वत्र मतदानाची लगबग सुरु आहे. गोव्यातून एक व्यक्ती मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबईत दाखल झाला पण, मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याला मतदार यादीनुसार मृत घोषित केल्याची माहिती मिळाली.

झाले असे की अँथनी ब्रागांझा नावाचे व्यक्ती गोव्यातून मुंबईत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झाले. मुंबादेवी मतदान केंद्रावर ते मतदान करण्यासाठी दाखल झाले. पण, केंद्रावर मतदान यादी तपासून पाहिली असता त्यांना मृत घोषित केल्याची माहिती. लोकसभेत मतदान केलेल्या अँथनी यांना मृत घोषित केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना धक्काच बसला.

अँथनी ब्रागांझा मध्य मुंबईतील एका चाळीत राहतात. कामानिमित्त ते गोव्यात असतात. लोकसभेसाठी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दरम्यान, विधानसभेसाठी त्यांना मतदार यादीत मृत घोषित केल्याने त्यांना मतदान करण्यापासून रोखण्यात आले. यामुळे मतदान केंद्रावर काही काळ गोंधळ निर्माण झाला.

गोव्यातून चक्क मृत व्यक्ती आला मुंबईत मतदानाचा हक्क बजावायला, पुढं काय घंडलं? वाचा मतदान केंद्रावरील ड्रामा
Panaji Air Quality: पणजीत श्वास घेणं म्हणजे दिवसाला किमान दोन सिगारेट ओढणं? वाचा धक्कादायक रिपोर्ट

केंद्रावर गोंधळ निर्माण झाल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्तांनी ब्रागांझा यांची भेट घेतली आणि विषय समजावून घेतला. कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर ब्रागांझा यांनी मतदान कार्ड आणि आधार कार्ड दाखवल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांना विश्वास पटला. ब्रागांझा यांनी यावेळी त्यांनी हयातीचा अर्ज देखील भरल्याची माहिती दिली.

ब्रागांझा हयात असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांना मतदान करता आले. दरम्यान, या घटनेमुळे मतदान केंद्रावर काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com