Chamundeshwari Naukavihar  Dainik Gomantak
गोवा

Pilgao: ‘श्री चामुंडेश्‍‍वरी माता की जय’! वरगाव-पिळगाव भक्तिमय, रंगला नौकाविहार; दिंडी-पालखी, फटाक्यांची आतषबाजी

Chamundeshwari Naukavihar: कालोत्सवानिमित्त राज्याच्या विविध भागांतून तसेच शेजारच्या तालुक्यांतून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आपली श्रद्धा व्यक्त केली.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: दिंडीसह पालखी आणि शेकडो भाविकांच्या उपस्थितीत वरगाव-पिळगाव येथील जगदंबा श्री चामुंडेश्‍‍वरी देवीचा वैशिष्ट्यपूर्ण आणि पारंपरिक नौकाविहार सोहळा यंदाही अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला.

रविवारी मध्यरात्री देवीच्या मंदिराजवळील तलावात हा अद्वितीय सोहळा पार पडला. ‘श्री चामुंडेश्‍‍वरी माता की जय’च्या जयघोषात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत संपूर्ण देवस्थान परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि दीपांच्या प्रकाशात हा सोहळा अलौकिक शोभेने उजळून निघाला.

पंचशताब्दी परंपरा लाभलेल्या या कालोत्सवानिमित्त राज्याच्या विविध भागांतून तसेच शेजारच्या तालुक्यांतून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आपली श्रद्धा व्यक्त केली. अनेक भाविकांनी नवसपूर्ती, मनोकामना आणि कुटुंबीयांच्या कल्याणासाठी देवीसमोर प्रार्थना केली.

सोमवारी सकाळी साजरा झालेल्या दहीकाल्याने या कालोत्सवाची सांगता झाली. दहीहंडी झाल्यानंतर पालखीचे मंदिरात आगमन झाले. त्यानंतर सार्वजनिक गाऱ्हाणे, आरती, प्रसाद वाटप व इतर पारंपरिक कार्यक्रम पार पाडण्यात आले. या सर्व सोहळ्यांमुळे संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण पसरले होते. कालोत्सवाचे वैशिष्ट्य असलेल्या ‘नौकाविहार’ सोहळ्याला यंदाही भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

रौप्य शिबिकेतून देवीची पालखी मिरवणूक

रात्री फटाक्यांची आतषबाजी आणि दिंडीसह श्रींची रौप्य शिबिकेतून पालखी काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात पालखी देवस्थान परिसरातून तलावापर्यंत नेण्यात आली. नंतर मध्यरात्री पारंपरिक विधींनुसार तलावात ‘नौकाविहार’ सोहळा पार पडला. पाण्यावर उमटणारे दीपांचे प्रतिबिंब आणि फुलांच्या पाकळ्यांनी तलावाचे दृश्य अत्यंत रम्य बनले होते.

संपूर्ण परिसरात मंगलमय वातावरण

कालोत्सवानिमित्त सकाळी श्री चामुंडेश्‍‍वरी देवीच्या चरणी महाभिषेक, महापूजा, महाआरती आदी धार्मिक विधी पार पडले. सकाळपासून भाविकांतर्फे स्वहस्ते अभिषेक करण्यात आला. दिवसभर ओट्या भरणे तसेच मागणीची पड अर्पण करण्याचा कार्यक्रम झाला. सुवासिनींतर्फे कुंकूमार्चन सेवा अर्पण करण्यात आली. विविध गावांतील शेकडो भक्तगणांनी देवीच्या दर्शन-सेवेचा लाभ घेतला. यावेळी मंदिर परिसरात भजन, कीर्तन व भक्तिगीतांचा कार्यक्रमही झाला. त्यामुळे संपूर्ण परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT