Goa SEZ Workers & Farmers Protest Dainik Gomantak
गोवा

Goa SEZ Workers Protest: तोडगा नाहीच! पिळगाववासीयांचा प्रश्‍‍न अधांतरी; ‘सेझा’ कामगारांप्रति मुख्‍यमंत्र्यांचा कळवळा

Goa Farmers Issues: सारमानस, माठवाडा-पिळगाव येथील शेतकरी व ‘सेझा’चे (वेदान्‍ता) कामगार यांच्या प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी येथील रवींद्र भवनात बैठक घेण्‍यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Sankhali News: सारमानस, माठवाडा-पिळगाव येथील शेतकरी व ‘सेझा’चे (वेदान्‍ता) कामगार यांच्या प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी येथील रवींद्र भवनात बैठक घेण्‍यात आली, पण तोडगा मात्र निघू शकला नाही. काही कारणास्तव मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. त्‍यामुळे मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली.

बैठकीत काही मुद्दे, विषय शेतकरी (Farmer) व कामगारांसमोर ठेवण्यात आले, परंतु तोडगा निघाला नाही. याबाबत बोलताना शेतकरी संजय फाळकर यांनी सांगितले की, पिळगावातील ९० टक्के शेतकरी एकत्र आहेत. मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती, पण ते येऊ शकले नाहीत. आम्ही शेतकरी व कामगारांच्या मागण्या आमदारांकडे मांडल्या आहेत. ते कंपनीशी बोलतील. तसेच आम्हीही आम्हाला सुचविलेल्या तोडग्यावर शेतकऱ्यांशी बोलून आमची भूमिका ठरविणार आहोत. विषय निकाली निघेपर्यंत लढा सुरूच राहील.

कामगारांकडून ४५ दिवसांचा सेटलमेंट प्रस्ताव

‘सेझा’ने कामगारांना कमी केल्यानंतर त्यांचे योग्य सेटलमेंट व्हावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी ग्रॅच्युएटी ४५ दिवसांची देण्याची आम्ही मागणी केली होती. परंतु आजच्या चर्चेअंती कंपनीकडून ३५ दिवसांची सेटलमेंट देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्‍याबाबत आमदार, उपजिल्हाधिकारी आमच्‍यामार्फत कंपनीशी बोलणी करणार आहेत, असे बाबाजी गावकर यांनी सांगितले.

नुकसान भरपाई किती देणार, हे लेखी द्या!

शेतकऱ्यांचा विषय सोडविण्यासाठी कंपनी सरकारमार्फत (Government) प्रयत्न करत असताना नुकसानभरपाईचा एक दर दिला आहे. परंतु लेखी स्वरूपात काहीच दिलेले नाही. कंपनीच्या तोंडी आश्‍‍वासनांवर आमचा विश्वास नाही. सध्या माठवाडा ते सारमानस या शेतांमध्ये ७५ शेतकरी आहेत. सारमानस येथे ८० हजार चौरस मीटर तर माठवाडा येथे ९० हजार चौरस मीटर इतकी शेतजमीन आहे. ही संपूर्ण शेतजमीन या खाण कंपनीमुळे उद्‌ध्‍वस्‍त झाली आहे. ती पूर्ववत करून द्यावी अशी आमची मागणी आहे, असे शेतकरी सुधाकर वायंगणकर व नंदा फाळकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आज बैठक बोलावण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. तरीही त्यांनी माझ्‍याशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली. कामगारांना सेटलमेंटअंतर्गत जो वार्षिक १५ दिवसांचा लाभ कंपनीने दिला होता, तो वाढवून ३५ दिवसांचा ग्रॅच्युएटी लाभ सेटलमेंटअंतर्गत देण्याची घोषणा त्‍यांनी केली आहे. आता कामगारांनी चर्चा करून निर्णय घ्यायचा आहे. या प्रकरणी समाधानकारक तोडगा निघावा यासाठी प्रयत्नशील आहे.- प्रेमेंद्र शेट, आमदार (मये)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT