Farmers protest in Pilgan :धारगळ येथे अपघात, पिळगावात शेतकऱ्यांचे आंदोलन; गोव्यातील ठळक बातम्या

Marathi Breaking News 12 December 2024: गोव्यातील राजकारण, कला-क्रीडा-संस्कृती, गुन्हे, पर्यटन विश्वातील महत्वाच्या बातम्या
Accident News
Accident NewsDainik Gomantak
Published on
Updated on

मोबाईल चोरी करुन फरार होण्याच्या तयारीत असणाऱ्या व्यक्तीला अटक

बीच शॅकमधील कर्मचाऱ्याचा मोबाईल चोरी करुन फरार होण्याच्या तयारीत असणाऱ्या व्यक्तीला कळंगुट पोलिसांनी अटक केलीय. रोहित सुद्रोधर (रा. त्रिपुरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

धारगळ येथे अपघात; एक जखमी

धारगळ येथे टेम्पो आणि कार यांच्यात अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आणि या अपघातात कार चालक किरकोळ जखमी झाला आहे.

योगेश शेटकरच्या विरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल

योगेश शेटकर याच्याविरुद्ध मडगाव पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराचा आरोप आहे की योगेशने १,०५,००० रुपये गुंतवणूक म्हणून घेतले होते आणि मुद्दल परतफेड करण्याचे आश्वासन दिले होते.

Accident News
Goa Mining Issue: खनिज वाहतुकीचा मुद्दा तापला, पिळगावातील शेतकरी बायका मुलांसह रस्त्यावर; सरकारला सज्जड इशारा

प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ 2025 साठी मुख्यमंत्री सावंतांना निमंत्रण

प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ 2025 साठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या मार्फत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री दारासिंग चौव्हाण आणि राज्यमंत्री रामकेश निषद यांनी निमंत्रण दिले.

परिणामांना तोंड देण्याची तयारी ठेवा! शेतकऱ्यांचा इशारा

खनिज वाहतूकीबाबत 'वेदांता' ने सरकारला विकत घेतलंय, पिळगावच्या शेतकऱ्यांचा आरोप. पुढील परिणामांना तोंड देण्याची तयारी ठेवण्याचा इशारा.

सांगे येथे टाऊन हॉलची इमारत पाडण्यास सुरुवात

नगरपालिकेच्या मुख्याधिकारी व सभापतींच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. १२ डिसेंबर) रोजी सांगे नगरपालिकेने टाऊन हॉल नगरपालिकेची इमारत पाडण्यास सुरुवात केली.

Accident News
Sunburn Goa 2024: धारगळमध्येच होणार सनबर्न महोत्सव; पर्यटन खात्याकडून तत्वत: मान्यता

होमगार्ड पदांसाठी सलग दुसऱ्या दिवशीही उमेदवारांची मोठी गर्दी!

143 होमगार्ड पदांसाठी पहिल्या दिवशी बुधवारी 7 हजारांहून अधिक अर्ज आले तसेच आज सलग दुसऱ्या दिवशीही आल्तिनो येथे उमेदवारांची गर्दी पाहायला मिळाली.

E-Cigarette बाळगल्या प्रकरणी मोपा विमानतळावर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

मोपा विमानतळ पोलिसांनी ई-सिगारेट बाळगल्याप्रकरणी प्रवाशांविरुद्ध एफआयआर नोंदवल्या आहेत. पहिल्या घटनेत गुजरातमधील एका महिलेचा समावेश आहे तर दुसऱ्या घटनेत लंडनला जाणाऱ्या ब्रिटनच्या नागरिकाचा समावेश आहे.

माझ्या पत्नीवर विरोधकांचे खोटे आरोप; कायदेशीर कारवाई करणार! मुख्यमंत्री

माझी पत्नी राजकारणात आहे पण कोणत्याही प्रशासकीय कामात सहभागी नाही. ज्यांनी तिच्यावर सरकारी नोकरी प्रकरणाबाबत बिनबुडाचे आरोप केले आहेत, त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्याची प्रक्रिया आम्ही आधीच सुरू केली आहे: मुख्यमंत्री सावंत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com