Goa Pilgao Farmers: शेतकऱ्यांनी थोपटले दंड; खनिज वाहतुकीविरोधात ‘एल्गार’

Bicholim Pilgao Mining: पिळगावमधील शेतकरी आणि कोमुनिदादही आक्रमक; पोलिसांत तक्रार
Bicholim Pilgao Mining: पिळगावमधील शेतकरी आणि कोमुनिदादही आक्रमक; पोलिसांत तक्रार
Pilgao farmersDainik Gomantak
Published on
Updated on

आज-उद्या करीत अखेर आजपासून डिचोलीत ‘वेदांता’च्या खनिज वाहतुकीला सुरवात झाली खरी; परंतु पहिल्याच दिवशी खनिज वाहतुकीत विघ्न निर्माण झाले. या खनिज वाहतुकीविरोधात पिळगावमधील कोमुनिदाद आणि शेतकऱ्यांनी दंड थोपटले असून, कोणत्याही स्थितीत पिळगाव-सारमानसमार्गे खनिज वाहतूक करू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून खनिज वाहतुकीचा प्रतिकार करू, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. खनिज वाहतुकीचा हा वाद पोलिसांपर्यंत पोचला असून, ‘वेदांता कंपनी’विरोधात तक्रारही दाखल केली आहे.

पिळगावमधील कोमुनिदाद आणि शेतकऱ्यांचा विरोध असतानाही डिचोलीतील ट्रकमालक खनिज वाहतुकीस तयार झाले आहेत. आज (शनिवारी) काही ट्रक खनिज वाहतुकीसाठी रस्त्यावर उतरविले. ‘एनएसपी’ प्लांटवरून पिळगाव-सारमानसमार्गे खनिज वाहतूक सुरू झाली.

खनिज वाहतुकीच्या मार्गावर काही दिवसांपूर्वी कोमुनिदाद आणि शेतकऱ्यांनी घातलेले काटेरी कुंपणही मशिनरीद्वारे मोडले. कोमुनिदाद आणि शेतकऱ्यांना या प्रकाराची कुणकूण लागताच शेतकरी जमा झाले. शेतकऱ्यांनी खनिज वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. नंतर पोलिसांत धाव घेतली. या गडबडीत खनिज वाहतुकीच्या दहा फेऱ्या पूर्ण झाल्याची माहिती मिळाली.

ज्या मालमत्तेतून खनिज वाहतूक होत आहे, ती मालमत्ता पिळगाव कोमुनिदादची आहे. तरीदेखील ''वेदांता’ने बळजबरीने कोमुनिदादच्या मालमत्तेत अतिक्रमण केले आहे, असे कायदा सल्लागार ॲड. अजय प्रभूगावकर यांनी सांगून या कृतीचा निषेध केला.

याप्रकरणी कारवाई झाली नाही तर शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. बळजबरीने आमच्या शेतजमिनीत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सहन करणार नाही, असे शेतकरी सुधाकर वायंगणकर म्हणाले. वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

महेश वळवईकर म्हणाले की, आमचा खाण व्यवसायास विरोध नाही. मात्र, शेती उद्ध्वस्त करून खाण व्यवसाय नको. खाण व्यवसायामुळे आमचे पूर्वज कसत असलेली शेती नष्ट झाली आहे. खाणमाती, गाळ साचून शेतजमिनी बुजल्या आहेत. त्यामुळे गेल्या बऱ्याच वर्षांपासून शेतजमीन पडीक आहे.

Bicholim Pilgao Mining: पिळगावमधील शेतकरी आणि कोमुनिदादही आक्रमक; पोलिसांत तक्रार
Goa Pilgao Farmers: प्रसंगी मुलांबाळांसह जीवन संपवू; पिळगावमधील शेतकरी आक्रमक

मशिनरी जप्त करा

वेदांता कंपनीने नासधूस करून आमच्या मालमत्तेतून जबरदस्तीने खनिज वाहतूक सुरू केली असल्याची तक्रार पिळगावमधील शेतकऱ्यांनी पोलिस स्थानकासह डिचोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शेतकऱ्यांनी घातलेल्या काटेरी कुंपणाची मोडतोड केली असून, मशिनरी जप्त करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Bicholim Pilgao Mining: पिळगावमधील शेतकरी आणि कोमुनिदादही आक्रमक; पोलिसांत तक्रार
Goa Mining: राज्यातील खाणी ऑक्टोबरमध्ये सुरु होणार? दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना खाणमंत्र्यांचे आश्वासन

महेश वळवईकर, माजी सरपंच, पिळगाव

खाण कंपनीकडून आपदग्रस्तांना व्यवस्थित नुकसान भरपाई मिळत नाही. आता तर वेदांता खाण कंपनीने स्थानिक कामगारांना काढून टाकले आहे. उदरनिर्वाहासाठी शेतकऱ्यांना शेतजमीन हवी आहेत. शेतीसाठी आम्ही मुला-बाळांसह रस्त्यावर येण्यास तयार आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com