Saint Francis Xavier Exposition | Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Saint Francis Xavier Exposition: ओल्ड गोव्यात आजपासून (२१ नोव्हेंबर) संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे.

Pramod Yadav

पणजी: देशात बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे चार सदस्य आणि गोवा युथ फाउंडेशनच्या एकाची गोव्यात चौकशी करण्यात आली. सध्या सुरु असलेल्या संत फ्रान्सिस झेवियर शव दर्शन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा आणि शांतात बिघडवण्याच्या संभाव्या हालचालीवरुन ही चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.

गोवा पोलिसांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. दक्षिण गोव्यातून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे चार सदस्य यासिन नालुर, मोहम्मद हावेरी, इम्रान इलियास आणि शेख रौफ यांच्यासह गोवा युथ फाउंडेशनच्या अल्ताफ संडी यांची पोलिसांनी चौकशी केली.

ओल्ड गोव्यात आजपासून (२१ नोव्हेंबर) संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सामाजिक सलोखा आणि शांतात बिघडवण्याचा संभाव्य हालचाली सुरु असल्याची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर ही चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

यानंतर राज्यातील पोलिस अलर्ट मोडवर आले आहेत. राज्यात एकाचवेळी दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरील महोत्सव होत असल्याने दोन्ही सोहळे शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. दरम्यान, राज्यात इफ्फी आणि एक्सपोझिशन'साठी १३०० पोलिस, आयआरबी तुकडी, एटीएस पथक तैनात करण्यात आले आहे. शिवाय एक्सपोझिशनवर २४ तास सीसीटीव्हीच्या मदतीने नजर ठेवली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT