Goa Petrol And Diesel  Dainik Gomantak
गोवा

पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता

जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड आणि डब्ल्यूटीआय हे दोन्ही दर प्रति बॅरल $114 वर पोहोचले आहेत आणि जर किंमती याच पातळीवर राहिल्या तर कंपन्यांनाही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवणे भाग पडेल.

दैनिक गोमन्तक

गोवा: जागतिक बाजारात, कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 114 वर पोहोचली आहे, दरम्यान सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनीही मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. क्रुडच्या किमती वाढत राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असे बाजार विश्लेषकांचे मत आहे.

(Petrol-diesel prices likely to rise again)

तेल कंपन्यांनी रविवारीच सीएनजीच्या दरात वाढ केली होती, मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर तब्बल 41 दिवस स्थिर ठेवले आहेत. यापूर्वी मार्च-एप्रिलमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10.20 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

गेल्या वेळी 6 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. ब्रेंट क्रूडची किंमत सध्या प्रति बॅरल 114 डॉलर आहे आणि जर ती या उच्च पातळीवर राहिली तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्याचा दबाव कंपन्यांवर वाढेल. गोव्यात आज पेट्रोल ₹ 106.59 तर डिझेल ₹ 97.47 प्रति लिटर दराने विकले जात आहे.

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 106.59

  • Panjim ₹ 106.59

  • South Goa ₹ 106.51

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 97.47

  • Panjim ₹ 97.47

  • South Goa ₹ 97.39

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जारी केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

तुम्ही आजची नवीनतम किंमत याप्रमाणे जाणून घेऊ शकता

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी ९२२४९९२२४९ या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT