किनारी पट्ट्यात मोठ्या आवाजातील पार्ट्या वाढल्या

वर्षानुवर्षे राहणाऱ्या स्थानिकांचा त्रास कायम
BEACH PARTY
BEACH PARTYDainik Gomantak

गोव्यातील बहूतांशी भागात असणाऱ्या किनारी पट्ट्याभोवताली आज काँक्रीटच्या इमारती उभ्या राहील्या आहेत. तसेच किनारी पट्ट्यात असणारे हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब, कॅफे हे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या फॉर्म्युले वापरत असते. याचाच एक भाग म्हणून मोठ्या आवाजातील संगीत पार्ट्यांचे आयोजन करत मोठ्या आवाजात संगीत पार्टींचे आयोजन केले जाते आहे. याचा त्रास मात्र वर्षानुवर्षे किनारी पट्ट्यात राहणाऱ्या स्थानिकांचा त्रास वाढला आहे. (The parties grew louder in the coastal strip )

या पार्श्वभूमीवर अंजुना येथील स्तुती वड्डो येथील रहिवाशांनी सांगितले की, लहानपणी घराबाहेर बसून अभ्यास करत असे. आम्ही घराबाहेर शांततेत बसायचो. पण आज परिस्थिती वेगळी आहे. माझे घर काँक्रीटच्या बांधकामांमुळे समुद्राची मंद वाऱ्याची झुळूक बंद झाली आहे. आज आपण बाहेर बसून मंद वाऱ्याचा आनंद घेऊ शकत नाही. असे सांगितले.

BEACH PARTY
'गोव्यातील पंचायत निवडणुका जूनमध्ये शक्य नाहीत'

अंजुना गाव पूर्वी खूप शांत होते. काही ठराविक ठिकाणीच मोठ्या आवाजात संगीत फक्त रेव्ह पार्ट्यांमध्येच वाजवले जायचे आता मात्र प्रत्येक रेस्टॉरंट किंवा क्लबद्वारे वाजवले जाणारे संगीत खूप मोठ्याने आणि असह्य आहे. काही पार्ट्या पहाटेपर्यंत सुरू असतात, तर काही संध्याकाळी 6 वाजता सुरू होतात.असा अनुभव स्थानिकाने सांगितला.

BEACH PARTY
गोवेकरांना पुन्‍हा मिळणार हायफॅट दूध!

किनारपट्टीवरील अंजुना येथील आणखी एक रहिवासी म्हणाले, "किनारपट्टीची परिस्थिती सध्या खूपच वाईट आहे. मोठ्या आवाजात वाजणारे संगीतामूळे आमचे कान दुखवू लागले आहे आणि आम्हाला कोणतेही घरगुती कार्य करण्यास प्रतिबंधित केला जातो. रेस्टॉरंट्स आणि क्लबमध्ये मोठ्या आवाजात संगीत वाजवले जाते, या समस्येवर संबंधित अधिकाऱ्यांनी आळा घातला पाहिजे. या वाढत्या बेकायदेशीर गोष्टींवर नियंत्रण नसल्याने अशा समस्यांना उद्भवत असल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले.

आसगावस्थित रहिवाशाने सांगितले कि, मला जवळपास 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या क्लबद्वारे वाजवले जाणारे संगीत ऐकू येते, परंतु तोंडी तसेच लेखी तक्रारी देऊनही, कोणतीही कारवाई केली जात नाही. दररोज रात्री मोठ्या आवाजात संगीत पार्ट्या आयोजित केल्या जातात. ज्या दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत सुरू राहतात परंतु पोलिसांना बोलावले असता ते म्हणतात की अशा घटनांची नोंद नाही. पोलिसांना कळवल्यानंतरही पोलिस सहकार्य करत नसल्याचं ही सांगितलं

तसेच काही पार्ट्या रात्रभर सुरू असतात, तर काही संध्याकाळच्या वेळी सुरू होतात, तर इतर काही दुसर्‍या दिवशी पहाटेपर्यंत सुरू होते, PCR ला कॉल केल्यानंतरही कोणतीही कारवाई सुरू होत नाही. मी डीजीपी, पीआय, डीवायएसपी यांना देखील कॉल करतो, परंतु कोणीही उत्तर देत नाही” असे ही एका नागरिकाने आपली समस्या सांगितली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com