Goa Petrol-Diesel  Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol-Diesel Price: राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किंचित बदल; वाचा सविस्तर दर

Goa Petrol-Diesel Price: आज (7 मे) तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरानुसार राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाले आहेत.

Manish Jadhav

Goa Petrol-Diesel Price: आज (7 मे) तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरानुसार राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाले आहेत. दरम्यान, गुजरात, गोवा, झारखंड, केरळ, मध्यप्रदेश आणि मणिपूरसह काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. त्याचवेळी महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, बिहार आणि जम्मू-काश्मीरमध्ये इंधनाचे दर कमी झाले आहेत.

गोव्यातील (Goa) पेट्रोलच्या किमतीवर ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती, युद्धासारखे भू-राजकीय धोके, ज्यामुळे बाजारातील असंतुलन, पुरवठा-साखळीच्या समस्या इत्यादी अनेक घटकांचा प्रभाव पडतो.

दरम्यान, गोव्यात आजची डिझेलची किंमत ₹88.09 प्रति लीटर आहे, जी कालच्या ₹87.90 च्या दराच्या तुलनेत थोडीशी वाढ दर्शवते. गेल्या 10 दिवसात किमतींमध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. तर गोव्यात पेट्रोलची (Petrol) आजची सरासरी किंमत 95.39 रुपये प्रति लिटर आहे. 06-05-2024 रोजी गोव्यात पेट्रोलची किंमत 95.36 रुपये प्रति लीटर होती म्हणजेच आज पेट्रोलची किंमत कालच्या तुलनेत 0.03 रुपये प्रति लिटरने वाढली आहे.

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर

नोएडा : पेट्रोल 94.81 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 87.94 रुपये प्रति लिटर

गुरुग्राम: पेट्रोल 95.18 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 88.03 रुपये प्रति लिटर

चंदीगड : पेट्रोल 94.22 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 82.38 रुपये प्रति लिटर

हैदराबाद : पेट्रोल 107.39 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95.63 रुपये प्रति लिटर

जयपूर : पेट्रोल 104.86 रुपये आणि डिझेल 90.34 रुपये प्रति लिटर

पाटणा: पेट्रोल 105.16 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.03 रुपये प्रति लिटर

लखनऊ: पेट्रोल 94.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 87.74 रुपये प्रति लिटर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: सावर्डे पंचायतीची प्रलंबीत इमारत,कर्मचारी कमतरता दूर करणार

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT