Goa Congress | Amit Patkar  Dainik Gomantak
गोवा

MLA Disqualification: सभापती तवडकरांविरोधात काँग्रेस नेते अमित पाटकर यांची हायकोर्टात याचिका

आमदार अपात्रता सुनावणी प्रकरण

गोमंतक ऑनलाईन टीम

Amit Patkar: आमदार अपात्रता याचिकेवर सुनावणीप्रकरणी गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी कोर्टात धाव घेतली आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत 9 डिसेंबर 2022 पूर्वी दाखल केलेल्या याचिकेवर सभापतींनी काहीही कार्यवाही केलेली नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अशा पद्धतीच्या प्रकरणांमध्ये याचिका दाखल केल्यानंतर तीन महिन्यात कार्यवाही करणे अपेक्षित आहे. पण डिसेंबरमध्ये याचिका दाखल करूनही त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही.

त्यामुळे आता सभापतींविरोधात पाटकर यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. सभापतींना कार्यवाहीबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी याचिकेतून केल्याचे समजते.

विधानसभा निवडणुकीनंतर काही काळातच काँग्रेसचे 8 आमदार फुटून सत्ताधारी भाजपमध्ये सामिल झाले होते. तेव्हापासून या प्रकरणावरून दोन्ही बाजूंनी वाद, युक्तीवाद सुरू आहे. काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनीही याबाबत याचिका दाखल केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT