Miramar Viral Video Dainik Gomantak
गोवा

Miramar Beach Viral Video: मिरामार बीचवर घेऊन गेला कार, अखेर पोलिसांनी घडवली अद्दल

मिरामार बीचवर कार घेऊन गेलेल्या एकाला पणजी पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले.

Pramod Yadav

Miramar Beach Viral Video: गोव्यात समुद्रकिनाऱ्यावर वाहन घेऊन जाऊ नये असे वारंवार सांगितले असताना देखील काही पर्यटक आणि काही स्थानिक देखील या नियमाकडे दुर्लेक्ष करताना दिसतात.

यापूर्वी अनेकांना याप्रकरणी अशा घटनांमध्ये कारवाईला समोरे जावे लागले आहे. मात्र, काही जणांनी हम नही सुधरेंगे! असाच पवित्रा घेतल्याचे दिसते.

मिरामार बीचवर कार घेऊन गेलेल्या एकाला पणजी पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले.

मिरामार समुद्रकिनाऱ्यावर कार चालवत घेऊन गेले आणि रेतीमध्ये कार अडकल्याचा एक व्हिडिओ बुधवारी (दि.24) समोर आला होता. समाज माध्यामांवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत कार मालकाला ताब्यात घेतले. पासिंगवरून ही कार गोव्यातीलच असल्याचे दिसत आहे.

उत्तर गोवा पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेत भारतीय दंड संहिता कलम 279, 336 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पणजी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेऊन कार क्रमांक (GA 09A 2212) जप्त केले आहे.

दरम्यान, अशा कृत्यांना गोव्यात प्रतिबंध घालण्यात आला आहे. समुद्रकिनारा फिरण्यासाठी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मात्र, काहीजण बीचवर वाहने घेऊन जातात आणि त्यांची वाहने अडकून पडतात. शिवाय यामुळे त्यांच्यासह इतरांना देखील नाहक त्रास सहन करावा लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT