Goa Petrol-Diesel Price: बेळगावपेक्षा गोव्यात डिझेल महाग, पेट्रोल स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये आहे.
Petrol-Diesel Price In Goa
Petrol-Diesel Price In GoaDainik Gomantak

Goa Petrol-Diesel Price: देशात दररोज पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले जातात. गुरुवारी म्हणजेच 25 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करण्यात आले आहेत. अनेक शहरांमध्ये इंधनाच्या दरात बदल दिसून आला आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे.

गोव्याचे शेजारी राज्य महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पेट्रोल शंभरी पार असून डिझेल नव्वदच्या आसपास उपलब्ध आहे. बेळगावमध्ये पेट्रोल 102.69 रूपये तर, डिझेल 88.60 रूपये दराने विकले जात आहे. तर, मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये आहे.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.82

Panjim ₹ 97.82

South Goa ₹ 97.75

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.37

Panjim ₹ 90.37

South Goa ₹ 90.29

Petrol-Diesel Price In Goa
Adani Group: अदानी समूह व्हिएतनाममध्ये करणार मोठी गुंतवणूक, अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये...

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com