Mopa Taxi Association protest Dainik Gomantak
गोवा

Mopa Taxi Association Protest: मोपा टॅक्‍सीचालक आज उतरणार रस्‍त्‍यावर!

आंदोलन सुरू : टॅक्‍सी स्‍टँडचा प्रश्‍‍न धसास लावण्‍याची आग्रही मागणी

दैनिक गोमन्तक डिजिटल

Mopa Taxi Association Protest: मोपा-पेडणे येथील मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर अधिसूचित टॅक्सी स्टॅंड देण्यात यावा या मागणीसाठी दिलेली मुदत संपल्याने आज सोमवारी ग्रीन फिल्ड मोपा टॅक्सी असोसिएशन व मोपा लोकल टॅक्सी असोसिएशनने आपल्या टॅक्सी बंद ठेवून नागझर मैदानावर जोरदार आंदोलन केले.

मागणी मान्य झाली नाही तर उद्या मंगळवारपासून रस्त्यावर उतरण्‍याचा इशारा दिला.

सदर विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोलाने घेण्यात आल्या. अशा कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी चार महिन्यांपासून आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत, असे टॅक्सीचालकांचे नेते भास्कर नारुलकर यांनी सांगितले.

प्रस्‍ताव आंदोलकांनी नाकारला

संध्याकाळी मामलेदार अनंत मळीक, वाहतूक खात्याचे अतिरिक्त संचालक प्रल्हाद देसाई, पेडणे वाहतूक खात्‍याचे अधिकारी राजेश नाईक यांनी आंदोलकांचे नेते भास्कर नारुलकर व संघटनेचे अध्यक्ष उदय महाले यांच्याशी चर्चा केली.

या चर्चेत अधिसूचित टॅक्सी स्टॅंडसाठी अर्ज करण्याची सूचना केली. त्यावर, वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज करण्याचा नियम असल्याचे सांगून आंदोलक नेत्यांनी तो प्रस्ताव नाकारला. त्‍यामुळे आता मोठा पेच निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT