Goa Accident : बोणबाग-बेतोडा येथे कार झाली पलटी, हडफडे येथे दुचाकी घसरली; गेल्‍या 9 दिवसांत 10 जणांचा मृत्‍यू

अपघातसत्र सुरूच; आणखी 2 बळी, 5 गंभीर जखमी
Goa Accident
Goa Accident Dainik Gomantak
Published on
Updated on

सहल बेतली जीवावर; अपघातात तरुण ठार

कामगारदिनाची सुट्टी असल्याने वेर्णा येथील सहाजणांचा गट कारने सहलीसाठी निघाला खरा, पण वाटेतच अपघात झाल्याने एकजण दगावण्याची दुर्दैवी घटना बोणबाग-बेतोडा येथे घडली. हा अपघात आज सोमवारी दुपारी फोंडा महामार्गावर घडला. पंकज गणपती कोठारकर (26, मूळ कारवार) असे मृत तरुणाचे नाव आहे.

चालक तपस पात्रा (24) याचे कारवरील (जीए 08 के 8143) नियंत्रण गेल्याने कारने रस्त्यावरच दोन पलट्या मारल्या. गंभीर दुखापत झाल्‍याने पंकज कोठारकर हा ठार झाला. तर, विनय गुप्ता (32), अनिस कुसवा (20), राजू कुसवा (25), रणजीत कुसवा (26) तर तपस पत्रा (24) हे जखमी झाले. ते सर्वजण मूळ उत्तरप्रदेश येथील असून वेर्णा येथे राहतात.

एकुलता एक मुलगा गमावला

सर्वजण कामगारदिनी सुट्टी असल्याने उसगाव येथील एका फार्ममध्ये सहलीसाठी जात होते. अपघातात ठार झालेला पंकज गणपती कोठारकर हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. वेर्णा औद्योगिक वसाहतीत तो कामाला होता. आपला एकमेव आधार गेल्‍याने त्‍याच्‍या आईवडिलांवर मोठे संकट कोसळले आहे.

Goa Accident
Goa GST Collection: गोव्यासाठी खुशखबर! जीएसटी संकलनात 32 टक्के वाढ

मानसवाडा-कुंडई येथे कंटेनरने कारला मागून ठोकर दिली

मानसवाडा-कुंडई येथे काल रविवारी रात्री झालेल्या अपघातात एका दुकानाचे व नऊ वाहनांचे नुकसान झाले. यामुळे संतप्‍त कुंडई ग्रामस्थांनी ‘रास्‍ता रोको’ केला. अखेर आज सोमवारी दुपारी प्रशासन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांशी चर्चा केली व दोन दिवसांत वरिष्ठांशी बोलणी करून योग्य तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले.

पण अपघातग्रस्‍त कंटेनर हटविण्‍यास लोकांनी नकार दिला. त्‍यामुळे ते माघारी फिरले. दरम्‍यान, या ‘रास्‍ता रोको’चा वाहतुकीवर तेवढा परिणाम झाला नाही. या अपघातात माज वाटांगी (17), रेहान वाटांगी (14), शमीन वाटांगी (38), मेहबूब वाटांगी (48) यांच्‍यासह जयेश सावंत (29, मानसवाडा-कुंडई), राजेंद्र हरी फडते (51, कुंडई) हे जखमी झाले.

दैव बलवत्तर म्हणून वाचली मुले

हा अपघात जर दिवसा झाला असता तर मोठी प्राणहानी झाली असती. मानसवाडा-कुंडई येथे बाजारासाठी येणारे लोक तसेच बसथांब्यावर बसगाडीची प्रतीक्षा करणारे प्रवासी अशी तेथे दिवसभर गर्दी असते.

एका कारमध्‍ये आपल्या दोन मुलांना ठेवून आईवडील वस्तू खरेदीसाठी दुकानात गेले होते. याचदरम्यान हा अपघात घडला. कंटेनरने कारला मागून ठोकर दिली. मात्र पुढे झाडाला कार अडकली. त्यामुळे घसरत येणारा ट्रक तेथेच अडकून पडला. या कारमधील मुले किरकोळ जखमी झाली.

Kundaim Accident
Kundaim AccidentDainik Gomantak
Goa Accident
Goa Congress : गोव्यानंतर भाजपचा आता कर्नाटकात आणखीन एक जुमला; काँग्रेसचे भाजपवर टिकास्त्र

Kundaim हडफडे दुचाकी अपघातात पर्यटकाने गमावला जीव

हडफडे येथे झालेल्‍या आज झालेल्‍या दुचाकी स्वयंअपघातात एका पर्यटकाचा मृत्यू झाला. रियाझ अल्लासाब पिंजार (33, गदग कर्नाटक) असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्‍या माहितीनुसार, मयत रियाझ हा हडफडेहून कळंगुटकडे भाड्याच्‍या दुचाकीने (जीए ०३ एएच ५५६९) जात होता. फॅट फिश जंक्शनकडे तो पोहोचला असता तोल गेल्याने त्याच्या दुचाकीला अपघात घडला

यावेळी तो स्कूटरसह खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्‍यात आले, पण तेथील डॉक्‍टरांनी त्‍याला मृत घोषित केले.

कळंगुट पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यू म्‍हणून नोंद केली आहे. कळंगुट पोलिस स्थानकाच्या उपनिरीक्षक प्रगती मलिक या पुढील तपास करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com