sky lantern | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa News: पेडणे तालुका मर्यादित आकाशकंदील स्पर्धा

Goa News: स्पर्धा नानेरवाडा येथे आयोजित केली गेली.

दैनिक गोमन्तक

Goa News: श्री सोमनाथ कला व सांस्कृतिक संघ, (मळीवाडा-नानेरवाडा-कोंडलवाडा) पेडणेतर्फे दुसरी पेडणे तालुका मर्यादित भव्य आकाशकंदील स्पर्धा रविवार, 6 रोजी रात्री 8 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.

ही स्पर्धा नानेरवाडा, पेडणे येथील श्री सोमनाथ देवालयाच्या भव्य पटांगणात आयोजित केली असून स्पर्धेत 4100रु.चे पहिले, 3100रु.चे दुसरे आणि 2100रु.चे तिसरे अशी अनुक्रमे तीन पारितोषिके ठेवण्यात आलेली असून पाचशे रुपयांची तीन उत्तेजनार्थ पारितोषिके पुरस्कृत केली आहेत.

आकाशकंदील स्पर्धेसाठी फक्त पहिल्या पंचवीस स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाईल. गरज पडल्यास ऐनवेळी कार्यक्रमात फेरबदल करण्याचे अधिकार आयोजकांनी राखून ठेवलेले आहेत. इच्छुक स्पर्धकांनी पद्मनाभ आसोलकर किंवा दिप्तेश यांच्याशी संपर्क साधावा.

पेडणेत ‘कायदा सर्वांसाठी’ कार्यक्रम

उत्तर गोवा कायदा सेवा प्राधिकरण आणि पेडणे न्यायालयाची कायदा सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कायदा सर्वांसाठी’ या उपक्रमाखाली आठवडा बाजाराच्या दिवशी कायदा जागृती कार्यक्रम आयोजित करून कायद्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावे, यावर माहिती दिली.

व्यासपीठावर प्राधिकरण सचिव विजयलक्ष्मी शिवोलकर, पेडणे न्यायालयाच्या न्यायाधीश सुनिता गावणेकर, पेडणे वकील संघटनेचे अध्यक्ष मुरारी परब, वकील मंदार जोशी, प्रमुख वक्त्या वकील अक्षता पुराणिक भट उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT