Morjim | Water Shortage
Morjim | Water Shortage Dainik Gomantak
गोवा

Water Shortage: गोवा मुक्तीदिनीच वणवण; पाणी समस्येतून गोमंतकियांची मुक्ती कधी?

दैनिक गोमन्तक

Water Shortage: देश ‘आजादी का अमृत महोत्सव’ आणि राज्य गोवा मुक्ती दिनाचा 61वा वर्धापनदिन साजरा करत आहे. मात्र, पेडणे पालिका क्षेत्रातील सुरबानवाडा या दलित वस्तीतील रहिवाशांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे. आम्ही मागास म्हणून आम्हाला पाणी नाही का? असा सवाल करून जर इतरत्र पाणी येते, तर मग आम्हालाच पाणी का सोडले जात नाही,असा प्रश्न सुरबानवाडावासीयांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.

राहुल पेडणेकर ,दीपेश पेडणेकर, संजय पेडणेकर, आनंद पेडणेकर, उत्तम पेडणेकर रामनाथ पेडणेकर, दिलीप पेडणेकर, दिनेश पेडणेकर, रिया पेडणेकर, विमिता तांबोसकर, देविता पेडणेकर, दीप्ती पेडणेकर, संगीता तांबोसकर ,दीपा पेडणेकर, सुखदा तांबोसकर, सुमित्रा पेडणेकर, सावळे पेडणेकर आदींनी आम्हाला पाण्यासाठी वारंवार हाल सोसावे लागतात, अशी खंत मांडली.

मुख्यमंत्र्यांनी दखल घेण्याची मागणी

अनेकदा पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातले, निवेदने दिली. आमदारांकडे याचना केली. परंतु आजवर आम्हाला सुरळीत पाणीपुरवठा झालेला नाही. निदान आता तरी याची गंभीर दखल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घ्यावी,आणि आम्हाला नियमित पाणीपुरवठा करावा,अशी मागणी रहिवाशांनी केली.

टाकीचे झाकण उघडेच!

सुरबान वाडा पेडणे येथील रहिवाशांना ज्या टाकीतून पाणीपुरवठा केला जातो, त्या टाकीचे झाकण कित्येक महिने उघडे आहे. या प्रकारामुळे एखादी दुर्घटना घडू शकते, असा संशय रहिवाशी तांबोसकर यांनी व्यक्त केला.

पाणी नाही, पण बिल वेळेवर!

सुरबानवाडा येथे उंचावरील भागात एक पंधरा घरे आहेत, त्या घरांना पाणीपुरवठा नियमित होत नाही. आंदोलनानंतर पाणी सोडण्याची सूचना अधिकाऱ्यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांना केलेली होती, मात्र तिचीही कार्यवाही होत नाही. या परिसरात वयोवृद्ध रहिवाशी आहेत.

त्यांना, महिलांना नळाचे पाणी नसल्यामुळे अर्धा किमी अंतरावरील पारंपरिक विहिरीवर अवलंबून रहावे लागते. तिथून चालत जाऊन विहिरीचे पाणी आणावे लागते. तिथेच कपडे धुणे, आंघोळ करणे, असे करावे लागत आहे. नळांना वेळेवर पाणी मिळत नाही, मात्र नळाचे बिल वेळेवर येत असल्याचे रहिवशांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

Goa Today's Live News Update: कोण होणार ताळगावचे सरपंच-उपसरपंच?

Mapusa Urban Bank: ''म्‍हापसा अर्बनच्‍या दयनीय स्‍थितीला पर्रीकरचं जबाबदार'', रमाकांत खलप यांचा सनसनाटी आरोप

Goa Drug Case: पिशवीत सापडला दोन लाखांचा गांजा; तिस्क उसगाव येथे तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT