Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: स्मशानभूमीवरून पारोड्यात पेटला वाद

Pernem Police: स्थानिकांचा पोलिस ठाण्यावर धडक मोर्चा

दैनिक गोमन्तक

Pernem Police: पेडणे काही दिवसांपूर्वी येथील स्मशानभूमीत पाणी-विजेची समस्या निर्माण झाल्याने वादाचा भडका उडाला होता.

आता रविवारी हिंदू स्मशानभूमीवरून गुढी-पारोडा परिसरातील नागरिकांनी थेट पोलिस स्थानकावर धडक दिली.

येथील गावकऱ्यांनी त्यांच्या स्मशानभूमीला कुंपण घालण्यासाठी सर्व्हे करून सिमेंटचे पोल पुरले होते; परंतु काही दिवसांनी एका व्यक्तीने ते सर्व पोल काढून टाकले.

त्यानंतर पुन्हा गावकऱ्यांनी श्रमदानातून पोल लावल्यावर परत ते पोल उखडून टाकण्याचा प्रकार घडला.

गावकऱ्यांनी जिमी रॉड्रिग्स याला हे पोल हटवताना पाहिले होते. त्यामुळे आज स्थानिक लोक संतप्त झाले आणि त्यांनी थेट केपे पोलिस स्थानकात धडक मोर्चा नेला.

उपासो गावकर म्हणाले की, आमचे पूर्वज या जागेचा स्मशानभूमी म्हणून वापर करीत होते. या स्मशानभूमीकडे जाणारी वाट सार्वजनिक नाही.

रॉड्रिग्स हा पोर्तुगीज पासपोर्टधारक असल्याने त्याला या जागेवर हक्क सांगण्याचा अधिकार नाही.

जाब विचारला असता धमकी

सरपंच राजश्री गावकर यांनी फोनवरून जिमी याला जाब विचारला असता त्याने थेट सरपंचांवर धमकी दिल्याचीच केस दाखल केली.

त्यामुळे सरपंचांना पाठिंबा देण्यासाठी स्थानिक रहिवासी पोलिस ठाण्यात दाखल झाले. ही स्मशानभूमी एसटी समाजाची असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT