Goa Crime News: पंचसदस्यांसह दोघांवर खुनी हल्ला : सातजणांना अटक

Goa Crime News: मडगाव स्मशानभूमीत कचरा फेकताना रोखल्याने मारहाण
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News: मडगावातील मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत आज (रविवारी) संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कचरा फेकण्यासाठी आलेल्या इसमाला हटकले आणि त्याला कचरा न टाकू दिल्यामुळे दवर्ली-दिकरपालचे पंच सदस्य साईश राजाध्यक्ष तसेच स्मशानभूमीची देखरेख करणारे जयवंत फोंडेकर यांच्यावर चॉपर आणि इतर शस्त्रांनी हल्ला केल्याने पोलिसांनी सातजणांना अटक केली. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला आहे.

Goa Crime News
Goa Accident Case: चार अपघातांत चौघांचा अंत : तिघेजण जखमी

सुमारे 20 ते 25 लोकांनी येऊन मारहाण केली, असा दावा तक्रारदारांनी केला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांवर भादंसं कलम 307 नुसार (खुनाचा प्रयत्न) सातजणांना अटक केल्याचे फातोर्डाचे पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक यांनी पत्रकारांना सांगितले.

हल्लेखोरांमध्ये पाजीफोंड येथील जाफर बसू (वय ६० वर्षे), अफझल शेख (वय २५ वर्षे), जाफर खान (वय २५ वर्षे), साबुद्दिन काडकोल (वय २६ वर्षे), नासीर शेख (वय २६ वर्षे), कुडतरी येथील मंजुनाथ हरिजन (वय २३ वर्षे) आणि निजाम बसू (वय २६ वर्षे २६) यांचा समावेश आहे. 

निजाम बसू हा मडगाव हिंदू स्मशानभूमीत कचरा आणून टाकत असताना त्याला राजाध्यक्ष यांनी जाब विचारल्यामुळे वाद सुरू झाला.

त्यानंतर त्याच्या अन्य साथीदारांनी तिथे येऊन राजाध्यक्ष आणि फोंडेकर यांना मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी हिंदू धर्मियांचा उल्लेख करून त्यांना धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Goa Crime News
Goa Tourism 2023: गोवा पर्यटकांसाठी खरंच असुरक्षित आहे का? गोव्यात फिरताना या टिप्स फॉलो करा....

यासंदर्भात साईश राजाध्यक्ष म्हणाले की, मी माझे हॉटेल बंद करून पावणेचारच्या सुमारास स्मशानभूमीच्या रस्त्याने जात असता, एका युवकाला स्मशानभूमीच्या दिशेने जाताना पाहिले. त्याचा पाठलाग केला, तेव्हा तो कचरा घेऊन आला होता व त्याने तो स्मशानभूमीच्या पार्किंग जागेत तो फेकला.

मी त्याला हटकले असता, त्याने मला जाब विचारला. तेव्हा मी त्याच्या स्कूटरची चावी काढून घेतली आणि जयंत फोंडेकर याला फोन करून बोलावले.

तोपर्यंत निजामने आणखी १०-१२ जणांना तिथे बोलावले आणि आम्हाला मारहाण करण्यास सुरवात केली. त्यांच्याकडे चॉपर्स, कोयते, सुरे होत्या. सुदैवाने आम्ही त्यातून बचावलो.

एकाने तर म्हटले की ‘सबको चुन चुनके मारेंगे.’ हल्लेखोरांनी माझ्या गळ्यातली सोन्याची साखळी ओढून घेतली, तसेच जयंत फोंडेकर याच्या खिशातील पैसेही काढून घेतले, असे त्यांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच दवर्ली-दिकरपाल पंचायत क्षेत्रातील ग्रामस्थ, मठग्रामस्थ हिंदू सभेचे पदाधिकारी आणि मडगावातील नागरिकांनी फातोर्डा पोलिस स्थानकाबाहेर गर्दी केली. 

मठग्रामस्थ  हिंदू सभेचे अध्यक्ष भाई नायक हे त्वरित तिथे पोहोचले आणि त्यांनी दोघांनाही इस्पितळात नेऊन त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले.

हल्लेखोर अलगद सापडले

भाई नायक यांनी प्रथम मडगाव पोलिस स्थानकात आणि नंतर ही स्मशानभूमी  फातोर्डा पोलिस स्थानकाच्या हद्दीत येत असल्याने  फातोर्डा पोलिस स्थानकात तक्रार केली. भाई नायकांसह साईश आणि जयंत फातोर्डा पोलिस स्थानकात पोहोचण्यापूर्वीच ते सहा हल्लेखोर तिथे येऊन आपल्याला मारहाण केल्याची तक्रार करण्याच्या प्रयत्नात होते. तेव्हाच  पोलिसांनी त्यांना स्थानकात बसवून  ठेवले आणि नंतर त्यांना रितसर अटक केली.

मुख्यमंत्र्यांनी केली विचारपूस

याप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री  श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी मला फोन करून तब्येतीची चौकशी केली. तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिल्याचे राजाध्यक्ष यांनी सांगितले.  हल्लेखोर पाजीफोंड येथे शहाळे विकतात.

चून चूनके मारेंगे’ धमकी

भाई नायक म्हणाले की, संशयित अनेक दिवसांपासून शहाळ्यांचा राहिलेला कचरा, तसेच इतर कचरा स्मशानभूमीत आणून  फेकत. स्मशानभूमीच्या  कर्मचाऱ्यांनी अनेकदा त्यांना हटकले आणि जाब विचारला, तेव्हा त्यांना मारहाण करण्याची धमकी देण्यात आली होती.

मडगावातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला  आहे. मडगावात गुंडगिरी व दादागिरी वाढली आहे.  आम्ही कोणीही सुरक्षित नसल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे.   सरकारने याची गंभीर दखल घेऊन हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी. 

- शर्मद रायतूरकर, भाजप नेते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com