Mission For Local Banjo protest Pernem Dainik Gomantak
गोवा

Goa Infrastructure: डांबरीकरण खोळंबले, बेंजो वाजवून निषेध; मिशन फॉर लोकलतर्फे आंदोलन, आमदार प्रवीण आर्लेकरांवर टीका

Mission For Local Banjo protest Pernem: नाईकवाडा-तोरसे येथील रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणासाठी एक वर्षांपूर्वी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला होता.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पेडणे : नाईकवाडा-तोरसे येथील रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणासाठी एक वर्षांपूर्वी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला होता. मात्र, अद्याप या रस्त्याच्या कामासाठी कोणतीही हालचाल न झाल्याने मिशन फॉर लोकलतर्फे श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आलेला दगड बँजोच्या साथीने पेडणे येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाच्या कार्यालयात पोहोचवून अभिनव पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

मिशन फॉर लोकलचे निमंत्रक राजन कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी राजू नर्से, गजानन गडेकर, शशिकांत महाले, गजानन सावळ देसाई, रुपेश परब, रामचंद्र शिंदे, केकरे, दिगंबर नाईक, परेश वालम, पंकज पोळ आदी उपस्थित होते. यावेळी कोरगावकर यांनी सांगितले की, आमदार आर्लेकर यांनी ज्या रस्त्याचा शुभारंभ केला होता, त्या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम खात्याचा एकही अभियंता उपस्थित नव्हता.

तसेच, या रस्त्याचा प्रस्ताव मुख्य कार्यालयात पाठविण्यात आला असला, तरी अद्याप त्याला मान्यता मिळालेली नाही, असे सहाय्यक अभियंते गवस यांनी सांगितले आहे. दिशाभुलीचा आरोप तांबोसे-मोपा उगवेचे माजी सरपंच रुपेश परब यांनी सांगितले की, गेल्या ६ जून रोजी या रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करून हॉटमिक्स डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ मोठ्या थाटात करण्यात आला होता.

मात्र, या रस्त्याला अजूनही मंजुरी मिळालेली नसल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सहाय्यक अभियंत्यांनी सांगितले आहे. यावरून आमदार पेडणेकरांची दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, पेडणेकर अशा थापांना बळी पडणार नाहीत, असे ते म्हणाले. राजू नर्से यांनी आमदारांनी पेडण्याचा विकास पाच वर्षे मागे नेल्याचा आरोप केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT