Monsoon Update: राज्यात पुन्हा पावसाचा कहर? IMD कडून चार दिवसांचा 'येलो अलर्ट', अनेक भागांत मुसळधार सरींची शक्यता

IMD Goa Yellow Alert: गोव्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने (IMD) राज्यासाठी चार दिवसांचा 'येलो अलर्ट' जारी केला आहे.
IMD Goa Yellow Alert
IMD Goa Yellow AlertDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने (IMD) राज्यासाठी चार दिवसांचा 'येलो अलर्ट' जारी केला आहे. 26 जुलै ते 29 जुलै या कालावधीत उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच काही भागांत जोरदार वाऱ्यांचाही प्रभाव जाणवू शकतो.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस आकाश प्रामुख्याने ढगाळ राहण्याची शक्यता आहे. अधूनमधून जोरदार सरी कोसळण्याची शक्यता असल्याने दैनंदिन जनजीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

IMD Goa Yellow Alert
Goa E Tender Process: राज्यातील काही ग्रामपंचायतींकडून ई-निविदा नियम धाब्यावर; पाच लाखांवरील टेंडर पद्धतीत गैरव्यवहार

समुद्रकिनारी, डोंगराळ भाग तसेच नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचणे, लहान नाले आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होणे, तसेच डोंगराळ भागात माती घसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

IMD Goa Yellow Alert
Goa Road Accidents: गोव्यात दरमहा 23 जणांचा होतोय अपघाती मृत्यू ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती, दररोज 8 रस्ते अपघातांची नोंद

पर्यटकांनी घ्यावी काळजी

पावसासोबत काही ठिकाणी सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाण्यापूर्वी हवामानाची माहिती घेणे आवश्यक आहे. तसेच गोव्यात दाखल झालेल्या पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यांवर पोहताना किंवा वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेताना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com