Pernem police conduct raid and seize 31 canoes allegedly involved in sand mining in Terekhol river at Poraskade
Pernem police conduct raid and seize 31 canoes allegedly involved in sand mining in Terekhol river at Poraskade Dainik Gomantak
गोवा

बेकायदा वाळू उत्खननावर पुन्हा छापा 31 होड्या जप्त, पेडणे पोलिसांची कारवाई

दैनिक गोमन्तक

मोरजी : कॅप्टन ऑफ पोर्ट आणि पेडणे पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने दुसऱ्यांदा पोरासकडे येथे बेकायदा रेती व्यवसायाशी संबंधित असलेल्या होड्यावर कारवाई करत आज 29 रोजी एकूण 31 होड्या जप्त करण्याची कार्यवाही झाली. मागच्या चार दिवसापूर्वी कॅप्टन ऑफ पोर्ट आणि पेडणे पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने न्हायबाग पोरासकडे पुलाखाली कारवाई करून एकूण 26 होड्या जप्त करण्यात आल्या होत्या आज कारवाई करते एकूण 31 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

याविषयी कॅप्टन ऑफ पोर्टचे अधिकारी श्री शिरससईकर यांनी माहिती देताना तेरेखोल आणि शापोरा नदीत या दिवसात बेकायदा रेती व्यवसाय सुरू नसल्याचा दावा करत आमची जी बोट आहे ती बोर्ड दोन्ही नद्यांमधून फेरफटका मारत असतानाच रेती व्यवसाय आढळून आलेला नाही. त्यामुळे या भागात बेकायदा रेती नसल्याचा दावा केला. केवळ जमिनीच्या वरती ज्या 31 बोटी आहेत त्या बोटींना परवाने आहेस की, नाही किंवा कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही धाडी टाकल्या चे शिरसयिकर म्हणाले.

पेडणे तालुक्यातील तेरेखोल आणि शापोरा या दोन नद्या मधून बेकायदा भरमसाट रेतीन उपसा करणार्‍या होड्यावर कारवाई सुरू असल्याने संबंधित व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. तर दुसऱ्या बाजूने किनारी भागात मोठ्या प्रमाणात किनारी रेतीचे साठे होते ते इतरत्र वळवण्याचा प्रकार चालू आहे. तर काहीजणांनी किनाऱ्यावर असलेल्या होड्या इतरत्र ठिकाणी हळवंण्याचा प्रयत्न केला आहे.

पेडणे तालुक्यातील तेरेखोल आणि शापोरा या दोन नद्यांची दिवसा ढवळ्या रात्री-अपरात्री रेती व्यवसायिक लक्तरे तोडत आहेत,दोन्ही नद्या वर अत्याचार चालू आहे, दोन्ही नद्या ह्या जीवनदायिनी मानल्या जातात.या नद्या वर पेडणे तालुक्यातील जनतेचे जनजीवन अवलंबून आहे. आपल्यावर होत असलेल्या अत्याचारामुळे या दोन्ही जीवनदायिनी ढसाढसा रडत आहेत. आणि त्यांचे अश्रू पुसण्यासाठी ज्या खात्याचे अधिकारी असतात या नद्यांना संरक्षण देण्यासाठी त्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे नद्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पेडणे तालुक्यातील शापोरा आणि तेरेखोल या नद्या मधून बेकायदा मोठ्या प्रमाणात रेती व्यवसाय मागच्या कित्येक वर्षापासून चालू आहे.कोणत्या भागात किती होड्या आहेत. कोण कोण या व्यवसायात गुंतलेला आहे. याची पूर्ण माहिती खाण भूगर्भ खात्याच्या अधिकाऱ्यांना असते. परंतु बेकायदा चाललेल्या व्यवसायावर हे अधिकारी कारवाई करण्याचे नाटक अधून-मधून करत असतात. त्यामुळे अशा व्यावसायिकांचे आहे तेच फावते पेंडणे तालुक्याचा विचार केला तर केवळ दहा टक्के लोकांच्या होड्यांना परवाने आहेत. आणि 90 टक्के होड्या बेकायदा रेती उपसा करत आहेत. याची पूर्ण जाणीव खाण भूगर्भ खात्याच्या अधिकाऱ्यांनी असते परंतु त्यावर कारवाई करण्यास केवळ नाटक केलं जातं.

सध्या चार दिवस तरी ती व्यवसाय बंद आहे. परंतु महाराष्ट्र भागातून मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक सुरू आहे. ती बेकायदा रेती वाहतूक सुरू असल्याचा दावा व्यावसायिकांनी केला असून या रेती वाहतुकीवर वाहतूक खाते कशा पद्धतीने कारवाई करतात याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.

पेडणे तालुक्याचा विचार केला तर---

पेडणे तालुक्याचा विचार केला तर शापोरा आणि तेरेखोल या दोन्ही नद्यांमधून रेती व्यवसायात गुंतलेली किमान 500 व्यवसायिक आहेत. आणि या रेती व्यवसायावर किमान पाच हजार कुटुंबे अवलंबून असल्याची ही माहिती उपलब्ध होत आहे. बांधकाम क्षेत्रासाठी रेती हा महत्त्वाचा घटक बनला आहे. सर्व बांधकामासाठी किंवा रस्ते बनवणे संरक्षण भिंती उभारणे अशा वेगवेगळ्या कामासाठी तरी ती हा महत्त्वाचा घटक असल्याने मोठ्या प्रमाणात रेती उपसा चालू असतो. परंतु सरकारकडे हे व्यावसायिक आम्हाला परवाने द्या नियम काही शितील करा अशी मागणी व्यवसायिक करत आहेत .

बेसुमार रेती उपसा होत असल्यामुळे पेडणे तालुक्यातील शापोरा आणि तेरेखोल या दोन्ही नद्या ह्या पेडणे निवास यांच्या जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जातात. आज या दोन्ही नद्या कडे जरा लक्ष मारले तर दोन्ही नद्यांचे पात्र दिवसेंदिवस रुंदावत चालले आहे. परिणामी दोन्ही बाजूच्या बागायती शेती मोठ्या प्रमाणात नुकसानीत केली आहे. अनेक लाखो चौरस मीटर जमीन या दोन्ही नद्यांनी गिळंकृत केली आहे. शिवाय मोठी नारळाची झाडे दोन्ही नद्यांमध्ये जलसमाधी घेताना चे चित्र पहायला मिळत आहे. आणि हे चित्र पाहत असताना बागायतदार शेतकरी ढसाढसा रडतात. त्यांना कोणीही नुकसान भरपाई देत नाही किंवा नदीने गिळकृत केलेली जमीन सुद्धा त्यांना परत मिळणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

Mumbai Goa Highway: ठाकरे गटातील नेत्याच्या हत्येचा प्रयत्न, आमदाराच्या मुलावर आरोप; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

SCROLL FOR NEXT