'360 कुटुंबांच्या गैरसोयीचा प्रस्ताव जीआरबीच्या अधिकाऱ्यांसमोर मांडणार'

360 कुटुंबांना भेडसावणाऱ्या विविध समस्या जीआरबीच्या अधिकाऱ्यांसमोर ठेवणार; संकल्प आमोणकर
Mormugao MLA Sankalp Amonkar|Municipal Council
Mormugao MLA Sankalp Amonkar|Municipal CouncilDainik Gomantak
Published on
Updated on

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी जीआरबी कॉलनी सडा येथे पोलीस, वीज विभाग, पालिका आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त पाहणी केली. परिसरात चोरीच्या घटना वाढत आहेत. या परिसरात पावसाळ्यापूर्वीची कामे करण्याची मागणी पालिकेकडे केली आहे, रहिवाशांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचे निवारण करण्यासाठी संयुक्त बैठक घेतली. सडा येथील कचरा प्रक्रियेचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आमोणकर कचरा व्यवस्थापन विभागासोबत बैठक आणि संयुक्त पाहणी करणार आहेत. (Sankalp Amonkar carried out inspection along with officials from police, power and Mormugao Municipal Council)

तसेच या परिसरात पावसाळ्यापूर्वीची कामे करण्याची मागणी पालिकेकडे केली आहे. रहिवाशांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आरोग्य व मलनिस्सारण ​​विभागासोबत पुन्हा संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासनही आमोणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. आमोणकर यांनी असेही सांगितले की, सडा येथील कचरा प्रक्रियेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कचरा व्यवस्थापन विभागासोबत बैठक आणि संयुक्त पाहणी करणार असून, जीआरबी कॉलनीत पुनर्वसन केलेल्या सुमारे 360 कुटुंबांची प्रचंड गैरसोय झाली आहे.

Mormugao MLA Sankalp Amonkar|Municipal Council
डिचोलीत बसस्थानकाजवळ मजुरांची पोलिसांकडून धरपकड

या परिसरात चोरीच्या घटना वाढत आहेत. आम्ही वीज विभागाच्या अधिकार्‍यांना सर्व पथदिवे कार्यान्वित करण्यास सांगितले आहे, तर पालिकेला झाडे-झुडपांची वाढ साफ करण्यास सांगितले आहे. कारण, काही समाजकंटक त्याचा आश्रयस्थान म्हणून वापर करतात अशा तक्रारी आमच्याकडे आल्या असल्याचे ते म्हणाले. येथे राहणाऱ्या 360 कुटुंबांना भेडसावणाऱ्या विविध समस्या जीआरबीच्या अधिकाऱ्यांसमोर ठेवणार आहेत. आमोणकर म्हणाले, "मान्सूनपूर्व कामे करण्यात पालिका अपयशी ठरली असून, मी त्यांच्यासोबत बैठक घेऊन मान्सूनपूर्व उपाययोजनांबाबत चर्चा करणार आहे. परिसरासाठी नियोजित केले आहे. गटारे तूडूंब भरली आहेत, झाडे वाढली आहेत आणि आता विजेच्या तारांवर झाडांच्या वेली चढल्याने वीज समस्या निर्माण होण्याबरोबरच रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे. आमोणकर म्हणले.

इमारतींवरील पाण्याच्या टाक्या अतिशय जर्जर अवस्थेत असल्याने आणि काही टाक्यांमध्ये मेलेले पक्षी, तसेच मच्छरांची पैदास झाल्यामुळे लोकांना डेंग्यू, मलेरिया इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. पाण्याच्या टाक्या आता डासांनी भरल्या आहेत आणि ते प्रजनन केंद्र बनू शकतात. आम्ही मलनिस्सारण, जीआरबी, आरोग्य आणि इतर विभागांसोबत आणखी एक संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न मानवतावादी आधारावर सर्वोच्च प्राधान्याने सोडवू शकतो. माजी आमदार आणि नगरविकास मंत्र्यांनी कचरा प्रक्रिया करणारा प्लांट घेतला होता आणि कचरा सुरळीतपणे साफ केला जाईल असे लोकांना सांगितले होते.

पण वस्तुस्थिती अशी आहे की प्लांटमध्ये दररोज 5 टन कचरा उचलण्याची क्षमता आहे. आम्हाला दररोज 15 टन कचरा मिळतो आणि दररोज सुमारे दहा टन कचऱ्याचे ढीग साचून कचराकुंड्या तयार होत असून दुर्गंधी असह्य होऊन या रहिवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. गेल्या 15 वर्षांपासून आम्हाला फसवले जात आहे. याजागी 15 टन क्षमतेचा प्लांट मिळायला हवा होता. जेणेकरून कचरा सुरळीतपणे साफ करता येईल. येथे लोक मनमोकळेपणाने राहू शकत नाहीत. तसेच भटक्या कुत्र्यांची संख्या देखील वाढली आहे जे लोकांवर आणि लहान मुलांवर देखील हल्ला करतात. मी कचरा व्यवस्थापन मंत्रालयाच्या अधिका-यांची आणखी एक संयुक्त बैठक घेऊन तपासणी करेन असे आमोणकर शेवटी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com