गोवा

Pernem News: पेडणेत तिघा चोरट्यांकडून 13 लाखांचा माल जप्त; मोबाईल फोन, कॅमेरा, इयरफोन्स, घड्याळांचा समावेश

पेडणे पोलिसांची कारवाई; विविध ठिकाणच्या चोरीच्या घटनांमध्ये हात

Akshay Nirmale

Pernem News: राज्यातील विविध ठिकाणच्या चोरींच्या घटनांमध्ये सहभाग असलेल्या तिघा चोरट्यांना पेडणे पोलिसांनी बुधवारी अटक केली. शेरीफ रेहमान एम. (वय 45 ), शाजी पी. एम. (वय 42), श्रीतु कुमार (वय 30), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या संशयितांकडून सुमारे 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पैकी शेरीफ रेहमान आणि श्रीतु कुमार हे मूळचे केरळचे रहिवासी आहेत तर शाजी पी. एम. हा मूळचा कर्नाटकचा रहिवासी आहे. पोलिसांना हे तिघे कळंगुट भागात असल्याची माहिती मिळाली होती. या तिघांच्या टोळीने अनेक चोऱ्या केल्या होत्या. पेडणेचे पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत, पोलिस उपनिरीक्षक हरिष वायंगणकर, पोलिस उपनिरीक्षक विवेक हळर्णकर यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके करून या तिघांना पकडण्यात आले.

पेडणे तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या चोऱ्यांमध्ये या तिघांचा सहभाग होता. आश्वे, मांद्रे, मोरजी येथे त्यांनी चोरी केली होती. विशेषतः भारतीय पर्यटकांसह परदेशी पर्यटकांना हेरून ते चोरी करत होते. गेले दोन महिने त्यांनी घरफोड्या करत उच्छाद मांडला होता. रात्रीच्या वेळी घरफोड्या केल्याचे त्यांनी मान्य केेल आहे.

त्यांच्याकडून मोबाईल फोन, कॅमेरा लेन्सेस, वायरलेस इअरफोन्स आणि स्पीकर, मनगटी घड्याळे, अॅपलचे आयपॉड आणि एक रिट्झ कार असा एकूण 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तिघांकडून आणखीही चोरींच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.

पोलिस कॉन्स्टेबल प्रज्योत मयेकर, प्रेमनाथ सवालदेसाई, राजेश गावडे, जनार्दन गावकर, शबाजी राऊळ, विन्सी डायस यांचा पोलिस पथकात समावेश होता. त्यांना पेडणेचे एसडीपीओ राजेश कुमार यांचे मार्गदर्शन लाभले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT