Pernem पेडणेची सुप्रसिद्ध पुनव कोजागिरी उत्सवात साजरी Dainik Gomantak
गोवा

पेडणेची सुप्रसिद्ध पुनव कोजागिरी उत्सवात साजरी; भाविकांची गर्दी

पेडणे चा सुप्रसिद्ध पुनव कोजागिरी उत्सव 20 रोजी साजरा झाला आहे

दैनिक गोमन्तक

पेडणे: शब्दांची किमया आजही अखंडितपणे चालू आहे , ध चा मा करणारे महाभाग आजही दिसतात , धरा म्हटले होते तर त्याचा मा करून मारा असा केला त्यावेळी शब्दांचा खेळ करून अनेकांना फसवले गेले .आता चक्क देवालाही फसवण्यास मनुष्य तरबेज आहे .की काय अशी शंका होती.

पेडणेची सुप्रसिद्ध पुनव कोजागिरी उत्सवात साजरी; भाविकांची गर्दी

पेडणे चा सुप्रसिद्ध पुनव कोजागिरी उत्सव 20 रोजी साजरा झाला आहे, 20 रोजी मध्यारात्री , भूत काढण्याच्या प्रकारानंतर , श्री भूतनाथ आणि श्री देव रवळनाथ या दोन्ही देवांची तरंगे अवसारात नाचवली गेली , त्यातील भूतनाथचे तरंग अचानक डोंगरमाळरानाच्या दिशेने जावू लागते , ते रोखून धरण्यासाठी भक्त महाजनाची धावपळ सुरु होते . हा क्षण पाहण्यासारखा होता

भूतनाथ देवाला भक्त माळरानात देवून बांधून देण्याचे आश्वासन दिलेले असते , त्याची पूर्तता होत नाही , एका रात्रीत आणि एका वातीत हे मंदिर भांधायचे असते ते आजच्या घडीला शक्य नाही . देव भक्तावर राग धरतो आणि दरवर्षी पुनवेला देवाला संधी मिळते , तरंग माळरानाच्या दिशेने पाळण्याच्या अंतिम टप्प्यात असते त्यावेळी देवाला परत एकदा मानकरी बांध तू सायबा असे आश्वासन देतात आणि ते आश्वासन हेरून हे तरंग मागे , या शब्दांच्या खेळात भूतनाथ फसला जातो , महाजन देवालाच सांगतात बांध तू सायबा .

भाविकांची गर्दी

डोंगर माळरानावर भूतनाथ स्थळ आहे .त्या ठिकाणी दोन प्रतिकृती उभे भूतनाथचे दगड आहे , परिसरात मोठ मोठी झाडे आहेत पूर्ण परिसर हा सावलीत असतो , दरवर्षी या ठिकाणी वार्षिक जत्रोत्सव होतो .

भूत काढण्याचा प्रकार

काही व्यक्ती ढोलताश्यांच्या तालावर घुमू लागतात अश्या भूतबाधा असलेल्यांच्या तोंडाजवळ मशाल नेवून त्यांच्यावर प्रभाव टाकला जातो किंवा अन्य प्रकारे घुमणाऱ्याला घाबरून देव त्यांच्यावरचे भूत काढतो या घुमणाऱ्या व्यक्ती खरे तर मनोरुग्ण असतात व त्याना ठीक करण्यासाठी या ठिकाणी आणले जाते . ढोल ताश्यांच्या तालासुरात भूतनाथ हा भूत काढण्याचे प्रयोग करतो . आता बाफ्दाल्त्या कालानुसार व शैक्षणिक प्रसारामुळे या प्रठेमाग्चे महत्व कमी झाले आहे . भूत काढण्याचा प्रकार संपल्यानंतर देव भूतनाथचे तरंग डावीकडील डोंगराच्या दिशेने धावु८ लागते ब. भक्त गणांनी देवाला देवूळ बांधण्याचे आश्वासन दिलेले असते . पण त्याची अजिबात कार्यवाही न केल्यामुळे देव नाराजी व्यक्त करून जात असतो . मग बांध तू सायबा असे चकवा देणारे आश्वासन भक्तगण या देवाला देतात , तेव्हाच भूतनाथाचे तरंग फिरून मागे येते . पालखीच्या वेळी होणारा हरहर महादेवाचा गजर तेव्हा पोर्तुगीज गव्हर्नरला आक्षेपार्ह वाटला . त्याने हा दसरोत्सव बंद करण्याचे ठरविले होते . पण जसे भूतनाथला देवून बांध तू सायबा असे म्हणून गप्प केले जाते . तसेच या गव्हर्नरला या उत्सवात योग्य मान देवून गप्प केले गेले . त्यालाही पेडणेकरांनी या उत्सवात सहभागी करून घेतले . आज पौर्तुगीज राहिले नाहीत गव्हर्नर्स राहिला नाही . फक्त राहिला गव्हर्नरचा मान तो सध्या मामलेदार घेत असतो . भूतनाथ मंदिर विषयी माहिती देताना देवस्थान अध्यक्ष जितेंद्र देशप्रभू यांनी सांगितले कि पूर्वी एका रात्रीत आणि एका वातीत भूतनाथ भक्तांकडे मंदिर बांधून देण्यासाठी मागाचा , त्यावेळी भक्त होय सायबा म्हणून वेळ मारून न्यायचे , हल्ली 10 १५ वर्षांत शब्दांचा खेळ चालू झाला बांध तू सायबा असा झाला . डोंगर माळरानावर भूतनाथ आणि रवळनाथ देवाचे दोन खांब आहेत त्याठिकाणी झाडे आहेत , मंदिर बंधने शक्य नाही. मंदिर बांधायचेच नाही . देवूळ बांधण्यासाठी भगवती ,देवीने कौल दिला नाही . .दसऱ्या दिवशी तिथे पूजन होते , त्या ठिकाणी जो जात्रोतास्व होतो त्याला भगवती पंचायातांचा काहीही सबंध नाही . भगवती पंचायतन कशात जेवढी मंदिरे येतात त्या ठिकाणी जत्रोत्सव होत नाही , एकाच मोठा उत्सव होतो टो म्हणजे पुनव असे देशप्रभू म्हणाले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: ‘घर नाही, पैसा नाही तरीही त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य माणुसकी शिकवणारं’

IFFI 2024: इफ्फीमध्ये 'एंटरटेनमेंट, सबका हक'! तिकीट न घेता Picture Time; सिनेमागृहाची आगळीवेगळी संकल्पना जाणून घ्या

Goa Live News Today: माजी सरपंच प्रशांत नाईकांकडून प्राथमिक शाळेला लाकडी बाक प्रदान

Cash For Job Scam: अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखोंना गंडा; मडगावात दोन भामट्यांविरोधात तक्रार दाखल!

Goa CM Meet Fadanvis: मुख्यमंत्री सावंतांनी गळाभेट घेऊन फडणवीसांना दिल्या विजयाच्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT