Goa Agriculture Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: पेडण्यात शेतीकामांना वेग; नांगरणी सुरू भातशेतीची लगबग: बियाणे, खत टंचाई, राजकीय मोफत योजनांचा परिणाम

Pernem Monsoon Paddy Farming Start: मान्सूनचे आगमन होताच पेडणे तालुक्यातील गावांमध्ये शेतीच्या प्राथमिक कामांना सुरवात झाली असून मळ्यांची नांगरणी, पेरणी आणि लागवडीची लगबग सुरू झाली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पेडणे: मान्सूनचे आगमन होताच पेडणे तालुक्यातील गावांमध्ये शेतीच्या प्राथमिक कामांना सुरवात झाली असून मळ्यांची नांगरणी, पेरणी आणि लागवडीची लगबग सुरू झाली आहे. पूर्वी बैलांच्या औताने केली जाणारी शेती आता मोठ्या प्रमाणात पावर टिलर व ट्रॅक्टरसारख्या आधुनिक यंत्रसामग्रीकडे वळली आहे.

त्यामुळे शेतीकामे अधिक जलद होत असली तरी खर्चातही वाढ झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

काही शेतकऱ्यांकडे स्वतःचे पावर टिलर आहेत, तर अनेक शेतकरी भाडेतत्त्वावर ट्रॅक्टर व टिलर घेऊन नांगरणी करत आहेत. एकाचवेळी सर्वांना यंत्र उपलब्ध होऊ शकत नसल्याने ठरावीक क्रमाने शेतीची कामे पूर्ण केली जात आहेत.

पावसाळ्याच्या सुरवातीला नांगरणी पूर्ण करून पेरणी किंवा लावणीसाठी शेतजमीन तयार केली जाते.

तालुक्यात भातशेतीसाठी दोन प्रमुख पद्धती वापरल्या जातात - पेरणी आणि लावणी. लावणी पद्धतीत उत्पादन अधिक मिळत असले तरी त्यासाठी अधिक मजूर व खर्च लागतो. त्यामुळे अनेक शेतकरी कमी श्रम व जलद प्रक्रिया म्हणून पेरणी पद्धतीकडे वळले आहेत.

तरीही पारंपरिक पद्धतीने लावणी करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहेत. अशा शेतकऱ्यांनी नांगरणी करून बी पेरणी केली असून साधारण २० ते २५ दिवसांत रोपे तयार झाल्यानंतर लावणी केली जाणार आहे.

बियाण्यांमध्ये ज्योती या वाणाला सर्वाधिक मागणी आहे. त्याशिवाय जया, कर्जत यांसारख्या बियाण्यांचाही वापर केला जातो.

शासनाकडून बियाण्यांवर ५० टक्के अनुदान दिले जात असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळतो. पेडणे शेतकरी सहकारी सोसायटी आणि गोवा बागायतदार संस्थेमार्फत बियाणे व युरिया खत उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र संपूर्ण (गुळी) खत अद्याप उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही शेतकऱ्यांनी आगाऊ रक्कम भरूनही खत न मिळाल्याची तक्रार केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT