MLA Pravin Arlekar Dainik Gomantak
गोवा

Pernem: मारहाण भोवली; आमदार प्रवीण आर्लेकर यांचा बिनशर्त माफीनामा

पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ व्हायरल

दैनिक गोमन्तक

पणजी: पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी एका उद्धघाटन कार्यक्रमात पत्रकाराचा मोबाइल फोन हिसकावून तो जमिनीवर फेकत गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरुन आमदार आर्लेकर यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. पत्रकारास दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, असे म्हटले आहे.

(Pernem MLA Pravin Arlekar tendered an apology for manhandling a journalist)

याबाबत बोलताना घडलेल्या प्रकारावरुन मी माफी मागतो, तसेच यापुढे अशी घटना माझ्याकडून कधीही घडणार नाही, याचे आश्वासन देतो असे आमदार आर्लेकर म्हणाले होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आमदार आर्लेकर यांनी एका पत्रकाराचा मोबाइल फोन हिसकावून तो जमिनीवर फेकला आहे. तसेच गैरवर्तन घडल्याचं ही या व्हिडीओत दिसत आहे. यावरुन आमदार आर्लेकर यांनी जाहीर माफी मागितली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

आमदार प्रविण आर्लेकर यांच्या हस्ते पायाभरणी समारंभ पार पडणार होता. हा कार्यक्रम सकाळी 10 वाजता सुरू होणार होता, परंतु प्रमुख पाहुणे असलेले आमदार 11.45 वाजता कार्यक्रम स्थळी पोहोचल्याने पत्रकारांनी विलंबाच्या कारणाविषयी विचारले असता, आर्लेकर यांनी पत्रकाराला शाब्दिक शिवीगाळ केली.

पत्रकाराला घटनास्थळ सोडून जाण्यास पत्रकारास सांगितले, मी यांच्या बातम्यांच्या कव्हरेजवर अवलंबून नाही. असे म्हटल्याचे रेकॉर्डिंगमध्ये दिसत आहे. यात आर्लेकर यांनी पत्रकारास मारहाण करून मोबाईलचे नुकसान केल्याचे चित्रण झाले.

विरोधी पक्षांनीही हे प्रकरण नेटाने उचलून धरले, गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले केले की, जेव्हा सत्ता डोक्यात जाते तेव्हा असेच होते. भाजप आमदार प्रवीण आर्लेकर यांनी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींशी आक्षेपार्ह कृत्य केले आहे. हे उदाहरण म्हणजे हुकूमशाहीचे उदाहरण असल्याचं म्हटले आहे.

याबाबत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ट्विट करत म्हटले आहे की, भाजप आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करतो, त्यांनी शिवीगाळ करताना आणि प्रसारमाध्यमांना मारहाण करताना व्हिडीओत पकडले आहे. यातुन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला ते असेच वागवत असल्याचा टोला लगावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

SCROLL FOR NEXT